विक्रीस बंदी असलेले पाच हजारांचे कापूस बियाणे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:17 AM2021-05-20T04:17:16+5:302021-05-20T04:17:16+5:30
जळगाव : शासनाकडून मान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत गुजरात येथील एचटीबीटी कापूस बियाणे विक्री ...
जळगाव : शासनाकडून मान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत गुजरात येथील एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करणाऱ्या श्रीकृष्ण ॲग्रो अमळनेर येथे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण श्रीराम तायडे यांनी सहकाऱ्यांसमवेत सापळा रचून पाच हजार रुपये किंमतीचे पाच कापूस बियाणे पाकिटे जप्त केली आहेत.
या प्रकरणी श्रीकृष्ण ॲग्रो व इरिगेशनचे मालक जितेंद्र दिनकर पाटील यांच्याविरोधात अमळनेर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, तालुका कृषी अधिकारी भरत वारे, मोहिम अधिकारी पी.एस. महाजन, कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी पंचायत समिती अमोल भदाणे, गणेश पाटील यांच्या सहकार्याने पूर्ण केली.