दहीगावच्या तरुणास साडेचार महिन्यात पाच वेळा सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2017 03:51 PM2017-06-14T15:51:21+5:302017-06-14T15:51:21+5:30

गणेश देविदास मिस्तरी या 30 वर्षीय तरुणास एक नव्हे, दोन नव्हे तर गेल्या साडेचार महिन्यात पाचव्यांदा सापने चावा घेतल्याची घटना

Five times in the fourth month of Dahigan's youth, snakebite | दहीगावच्या तरुणास साडेचार महिन्यात पाच वेळा सर्पदंश

दहीगावच्या तरुणास साडेचार महिन्यात पाच वेळा सर्पदंश

Next

ऑनलाईन लोकमत

दहीगाव, जळगाव, दि. 14 - यावल तालुक्यातील दहीगाव येथील गणेश देविदास मिस्तरी या  30 वर्षीय तरुणास एक नव्हे, दोन नव्हे तर  गेल्या साडेचार महिन्यात पाचव्यांदा सापने चावा  घेतल्याची घटना बुधवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान गणेशच्या राहत्या घरात घडली आहे. या घटनेने  गणेशचे कुटुंब भयभीत झाले आहे. गणेश यास येथील  ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. वारंवार अनपेक्षित  एकाच व्यक्तीस  साप  चावा घेत असल्याची ही दुर्मिळ असावी, असे तालुक्यात बोलले जात आहे.
तालुक्यातील दहीगाव येथील नावरे रस्त्यालगत गणेश देविदास मिस्तरी यांचे घर आहे. बुधवारी सकाळी साडेअकराचे दरम्यान गणेश मिस्तरी हे  पाण्याच्या माठाजवळ पाणी पित असताना अचानक चार-साडेचार फुटाच्या विषारी सापाने गणेशच्या डाव्या पायाच्या घोटय़ाजवळ कडाडून चावा घेतला. गणेशने आरडा-ओरड करताच कुटुंबियासह  शेजारी  धावून आले.    सापाने चावा घेतल्यानंतर साप बाहरेच्या दिशेने निघून गेल्याचे उपस्थितांनी  पाहिले. 
अनपेक्षित  की दैवी कारण
 एकाच  इसमास तब्बल पाच वेळा साप चावा घेतो म्हणजे यामागे काही दैवी कारण अशी वेगवेगळी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.  वारंवारच्या या घटनेने त्रस्त असलेल्या गणेशच्या कुटुंबीयांनी भविष्यकाराकडे धाव घेतली होती असता त्याने गणेशला 15 वेळा साप चावेल असे सांगीतले आहे.

Web Title: Five times in the fourth month of Dahigan's youth, snakebite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.