पाच वर्षांचा कार्तिक भावे इंडिया बुक रेकॉर्डमध्ये...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:11 AM2021-07-12T04:11:53+5:302021-07-12T04:11:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - कार्तिक मिहिर भावे या अवघ्या पाच वर्षांच्या विद्यार्थ्यांने वेगवेगळ्या १५० देशांचे राष्ट्रध्वज व विविध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - कार्तिक मिहिर भावे या अवघ्या पाच वर्षांच्या विद्यार्थ्यांने वेगवेगळ्या १५० देशांचे राष्ट्रध्वज व विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कारचा लोगो बघून ओळख करून देत, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड २०२१ मध्ये आपले नाव काेरून जागतिक कीर्तीमान स्थापन केला आहे.
कार्तिक सध्या त्याच्या आई-वडिलांसोबत पुण्यात राहत असून पुण्यातील एका शाळेत तो पूर्व प्राथमिकचे शिक्षण घेत आहे. त्याच्यात लहानपणापासूनच घरातील संस्कार घेत संस्कृत श्लोक, वेगवेगळ्या देशांचे भौगोलिक स्थान, मार्ग, वाहने यांची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्याच्यातील या गुणांना त्याची आई प्रियंका व वडील मिहिर भावे यांनी प्रोत्साहन देत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नकाशे व माहिती उपलब्ध करून दिली. आई प्रियंका यांनी त्याची पियानोच्या स्वरांची तयारी करून घेतली. त्याचे हे सर्व व्हिडीओ इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी पाठविले असता, या कणागुणांची दखल घेऊन कार्तिकचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले आहे.