सोशल डिस्टन्सचा उडाला फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 04:44 PM2020-04-02T16:44:10+5:302020-04-02T16:44:20+5:30
भुसावळ : स्वस्त धान्य खरेदीसाठी नियम तोडत प्रचंड गर्दी
भुसावळ : कोरोनामुळे राज्यात सर्वत्र जमावबंदीचे आदेश असताना आणि अत्यावश खरेदीसाठी सोशल डिस्टन अर्थात सामाजिक अंतर पाळण्यासह मास्क किंवार रुमाल वापरण्याचे आवाहन असताना भुसावळ शहरातील जाम मोहल्ला भागात स्वस्त धान्य दुकानावर धान्यासाठी लाभार्थ्यांची सकाळी सहा वाजेपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून या ठिकाणी शासनाच्या आदेशांचेउल्लंघन होताना दिसून येत आहे.
एकिकडे कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर शासन गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करत असताना इथे मात्र सर्व नियम पायदळी तुडविले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे स्वस्त धान्याचे दुकान सकाळी लवकर उघडून धान्य वाटप होईल व १० वाजेला बंद होईल अशी लोकांमध्ये चर्चा असल्याने व स्थानिक लोकांमध्ये कोरोनाच्या सोशल डिस्टंसिंगच्या नियमांच्या अज्ञानामुळे सदरील प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. तोंडाला देखील अनेकांनी मास्क किंवा रुमाल लावले नव्हते. यामुळे शासनाने लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.