संत सखाराम महाराज मंदिरावर ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 03:22 PM2019-05-07T15:22:37+5:302019-05-07T15:22:44+5:30

अमळनेर : संत सखाराम महाराज समाधी मंदिरावर ध्वज लावून आणि समाधी मंदिरामोर स्तंभारोपण करून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यात्रोत्सवाला प्रारंभ ...

Flag hoisting on the temple of Saint Sakharam Maharaj | संत सखाराम महाराज मंदिरावर ध्वजारोहण

संत सखाराम महाराज मंदिरावर ध्वजारोहण

googlenewsNext


अमळनेर : संत सखाराम महाराज समाधी मंदिरावर ध्वज लावून आणि समाधी मंदिरामोर स्तंभारोपण करून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यात्रोत्सवाला प्रारंभ झाला.
सकाळी १० वाजेला सखाराम महाराजांचे गादी पुरुष हभप प्रसाद महाराज यांचे वाडी मंदिरातून वाजत गाजत बोरी नदी पात्रात आगमन झाले. त्यांनतर समाधी मंदिराच्या मागे अन्नपूर्णा स्वयंपाक घराच्या पुरातन जागेवर विधिवत पूजा करून अन्नपूर्णा खांब रोपण करण्यात आले तदनंतर समाधी मंदिरांच्या पुढे अभय देव , सुनील देव ,जय देव , केशव पुराणिक , सारंग पाठक यांच्या हस्ते स्तंभाची पूजा करून स्तंभ रोपण करण्यात आले. समाधी मंदिरावर ध्वज लावण्यात आला. त्यानंतर प्रसाद महाराजांची पूजा करून सर्वांना गंध लावला. प्रसाद महाराजांनी जिल्हा न्यायाधीश राजीव पांडे, न्या. विक्रम आव्हाड, न्या. एच. ए. वाणी, न्या. अतुल कुलकर्णी, आमदार शिरीष चौधरी , आमदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, अनिल भाईदास पाटील, प्रांताधिकारी सीमा आहिरे, डी. वाय. एस. पी. राजेंद्र ससाणे, तहसीलदार ज्योती देवरे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, ए. पी. आय. प्रकाश सदगीर, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, वीज मंडळाचे हेमंत ठाकूर, संकेत मलठाने, संजय चौधरी यांचे श्रीफळ व प्रसाद तसेच कार्यक्रम निमंत्रण पत्रिका देऊन स्वागत केले यावेळी हरी भिका वाणी, भाऊसाहेब देशमुख, महेश कोठावदे, नितीन निळे, संजय कौतीक पाटील, शीतल देशमुख, अभिजित भांडारकर, सरपंच सुरेश पाटील, श्याम आहिरे, विक्रांत पाटील , प्रताप साली, चंदू साळी यांच्यासह प्रताप साळी व शहरातील प्रमुख हजर होते.

Web Title: Flag hoisting on the temple of Saint Sakharam Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.