भडगाव तालुक्यातील कजगाव येथे उड्डाण पूल व जोडरस्ता कामांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 11:16 PM2019-01-04T23:16:56+5:302019-01-04T23:18:17+5:30
कजगाव येथील रेल्वे उड्डाण पूल व जोडरस्ता कामाचे भूमिपूजन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कजगाव ता भडगाव, जि.जळगाव : येथील रेल्वे उड्डाण पूल व जोडरस्ता कामाचे भूमिपूजन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार पाटील म्हणाले, दरवर्षी दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे, कमी पर्जन्यमानामुळे छोट्या नद्यांना पाण्याचे प्रमाण कमी आहे यासाठी धरणातील वाया जाणारे पाणी छोट्या नदीत टाकले तर त्या रिचार्ज होतील यासाठी धरणातील पाणी पाटणादेवीच्या उमगावरून नदीपात्रात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
या वेळी व्यासपीठावर जि.प.सदस्य संजय पाटील, जि. प.गटनेते रावसाहेब पाटील, भडगाव पंचायत समितीचे सभापती रामकृष्ण पाटील, जि.प.सदस्य जालींदर चित्ते, शिवसेना जिल्हा उपप्रमुख गणेश परदेशी, गणेश पाटील, युवराज पाटील, पंचायत समिती सदस्य रावण भिल, शेतकरी संघटना तालुकाप्रमुख अनिल पाटील, माजी सभापती कैलास पाटील, तालुका प्रमुख विलास पाटील, सुमित पाटील, भोरटेक सरपंच उमेश पाटील, कजगावचे दिनेश पाटील, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता वींरेंद्र राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले
बहु प्रतिक्षित अशा या उड्डाणपुलास सन २०१६ मध्ये मान्यता मिळाली होती, मात्र वर्क आॅर्डर (कायार्रंभ) सन २०१८ मध्ये मिळाली. ६५० मीटर लांबी १३ मीटर रुंद असलेल्या १७ कोटी ३३ लाख रुपये खर्चाच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन ४ रोजी आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते झाले. या पुलामुळे कजगाव पारोळा मार्गावरील तसेच प्रसिद्ध अशा श्री क्षेत्र कनाशी या मार्गावरील रहदारीचा मोठा प्रश्न सुटणार आहे. याबरोबरच कजगावच्या सुंदरतेत भर पडणार आहे.