पूर आला धावून पुल गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:17+5:302021-06-09T04:21:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रीय महामार्गालगत पाळधी ते तरसोद दरम्यान गिरणा नदीवर तयार होत असलेल्या बायपासच्या पुलाच्या ठिकाणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रीय महामार्गालगत पाळधी ते तरसोद दरम्यान गिरणा नदीवर तयार होत असलेल्या बायपासच्या पुलाच्या ठिकाणी तयार करण्यात आलेला कच्चा पुल मंगळवारी आलेल्या गिरणा नदीच्या आवर्तनात वाहून गेला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी अचानक आलेल्या पाण्यामुळे या ठिकाणी काम करत असलेले कामगार थोडक्यात बचावले आहेत. तसेच पुलाच्या ठिकाणी काम करत असलेले दोन पोक लँड व जेसीबी कामगारांसह नदीच्या मधोमध अडकून पडले. तासाभराच्या बचावकार्य नंतर या कामगारांना पुरातून बाहेर काढण्यात आले.
गेल्या सात महिन्यांपासून या ठिकाणी बायपास पुलाचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, हे काम आता पुन्हा चार महिने रखडण्याची शक्यता आहे.