नाल्याला आलेल्या पुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:13 AM2021-07-16T04:13:45+5:302021-07-16T04:13:45+5:30

धरणगाव : महिला बचावली, पतीचा शोध लागेना धरणगाव, जि. जळगाव : मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात ...

Flood in Nala | नाल्याला आलेल्या पुरात

नाल्याला आलेल्या पुरात

Next

धरणगाव : महिला बचावली, पतीचा शोध लागेना

धरणगाव, जि. जळगाव : मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात शेतकरी पती-पत्नी बैलगाडीसह वाहून गेल्याची घटना निंभोरा, ता. धरणगाव येथे गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास येथे घडली. दरम्यान, या पुरातून महिला बचावली आहे. पतीचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही.

धरणगाव तालुक्यात गुरुवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. भागवत भिका पाटील (५५) आणि त्यांची पत्नी मालूबाई पाटील (५०) हे बैलगाडीने शेतातून घराकडे परतत होते. बैलगाडी खैऱ्या नाल्यातून जात असतानाच पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि त्यातच बैलगाडीसह पती-पत्नी वाहून गेले.

वाहून जात असताना मालूबाई हिने एका झाडाला पकडून ठेवल्याने ती बचावली. पोलीस पाटील गुलाब सोनवणे व ग्रामस्थांनी पाणी पातळी खाली गेल्यावर जवळपास दोन किमी अंतरापर्यंत पाहणी केली; पण भागवत हे कुठेही आढळून आले नाही. नाल्यापासून काही अंतरावर दोन्ही बैल मृतावस्थेत तर बाजूला गाडीही पडलेली आढळून आली.

दोन फोटो

अंगावर वीज पडून महिला ठार

हिंगणे पिंप्री येथील घटना

जामनेर जि. जळगाव : अंगावर वीज पडून जिजाबाई एकनाथ पाटील (५०, रा. हिंगणे पिंप्री, ता. जामनेर) ही महिला जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गावाजवळच घडली. जिजाबाई ह्या शेतातून काम आटोपून घरी परतत असताना ही घटना घडली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात

आला आहे.

Web Title: Flood in Nala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.