बोरखेडा खुर्द येथील पूरग्रस्तांना मिळाली शिक्षकांकडून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:18 AM2021-09-21T04:18:15+5:302021-09-21T04:18:15+5:30

यावेळी राष्ट्रीय शिक्षण संस्थेतून मदत निधी जमा करणारे शिक्षक अजय देशमुख,अभिमन्यू जाधव,चंद्रशेखर पवार,विलास पाटील,रमाकांत जावरे,अजिज खाटीक,साहेबराव चव्हाण,सुनील चव्हाण,पारस चौधरी,अजय ...

Flood victims in Borkheda Khurd get help from teachers | बोरखेडा खुर्द येथील पूरग्रस्तांना मिळाली शिक्षकांकडून मदत

बोरखेडा खुर्द येथील पूरग्रस्तांना मिळाली शिक्षकांकडून मदत

Next

यावेळी राष्ट्रीय शिक्षण संस्थेतून मदत निधी जमा करणारे शिक्षक अजय देशमुख,अभिमन्यू जाधव,चंद्रशेखर पवार,विलास पाटील,रमाकांत जावरे,अजिज खाटीक,साहेबराव चव्हाण,सुनील चव्हाण,पारस चौधरी,अजय सोमवंशी,प्रशांत आमले तसेच सरपंच संदीप पाटील,पोलीस पाटील शरद पाटील,उपसरपंच संदीप चव्हाण,रामदास चव्हाण,पुष्कर चव्हाण,वाल्मिकराव निकम आदी उपस्थित होते. नंतर चाळीसगाव शहरातील नदी किनारी असलेल्या नाईक वस्तीवर ही किराणा वितरित करण्यात आला. या समितीने याआधीही कोविड काळात ७५ हजारांची मदत कोरोनाने मृत्यू पावलेल्या शिक्षकाच्या कुटुंबास दिली होती तसेच ट्रामा केअर सेंटर येथे वॉटर कुलर व आर.ओ. सिस्टिम ४० हजार रुपयांची बसवून दिली . संपूर्ण कोविड काळात २४ हजारांचे पाणी विविध हॉस्पिटल्सला जाऊन कठीण काळात वितरित केले होते व आता १७ हजार रुपयांचे किराणा व धान्य वितरित करण्यात आले. संकटाच्या वेळी राष्ट्रीय शिक्षण संस्थेची मदत समिती सेवेसाठी नेहमी तत्पर असते. राष्ट्रीयता व गुरुवर्य या व्हाॅट्सॲप ग्रुपला आवाहन केल्यावर दानशूर शिक्षक तत्काळ मदत करतात असे ग्रुप प्रमुख अजिज खाटीक यांनी सांगितले.

फोटो मॅटर

चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा खुर्द येथील पूरग्रस्तांना मदत देताना शिक्षक २१/८

Web Title: Flood victims in Borkheda Khurd get help from teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.