विहिरीचे खोदकाम करताना पाण्यात बुडून मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2017 03:21 PM2017-05-06T15:21:18+5:302017-05-06T15:21:18+5:30

ही घटना शनिवार, 6 मे रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील सौखेडासीम शेत शिवारात घडली

Flooding drowning in the water while digging a well | विहिरीचे खोदकाम करताना पाण्यात बुडून मजुराचा मृत्यू

विहिरीचे खोदकाम करताना पाण्यात बुडून मजुराचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत

यावल, जि. जळगाव, दि. 6 -  खोदकाम करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या रमेश रामदास पाटील (वय 55) या मजुराचा   पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही  घटना शनिवार, 6 मे रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील सौखेडासीम शेत शिवारात घडली .
सौखेडासीम शिवारातील  गट नं. 844 मध्ये जयश्री पांडूरंग चौधरी यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम करण्यासाठी तालुक्यातील दहीगाव येथील  रमेश रामदास पाटील (वय 55) हे विहिरीत उतरले होते.  खोदकामासाठी  काही वेळाने इतर मजूर विहिरीत खाली उतरले असता रमेश पाटील  मृतावस्थेत आढळले. या प्रकरणी पोलीस पाटील पंकज बडगुजर यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून  आकस्मात मृत्यूची नोंद  करण्यात आली आहे. यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पाटील यांच्या मृत्यूमुळे दहीगावात शोककळा पसरली आहे. 
 

Web Title: Flooding drowning in the water while digging a well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.