भडगाव तालुक्यातील वाक येथील शेतकऱ्याने फुलवली केळीची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 05:26 PM2019-01-06T17:26:23+5:302019-01-06T17:27:58+5:30

भडगाव तालुक्यातील वाक येथील आदर्श शेतकरी नरहर नगराज पाटील यांनी तीन एकर टिशुकल्चर केळीच्या क्षेत्रात ३५ ची सरासरी रास आकारत केळीची बाग चांगली फुलविली आहे.

Flora banana garden in Wahe village of Bhadgaon taluka | भडगाव तालुक्यातील वाक येथील शेतकऱ्याने फुलवली केळीची बाग

भडगाव तालुक्यातील वाक येथील शेतकऱ्याने फुलवली केळीची बाग

Next
ठळक मुद्देतीन एकरातून १४ लाखांच्या उत्पन्न मिळणारकेळी लागवडीपूर्वी शेतीत मारला रोटाव्हेटरएक हजार रुपये मिळाला केळीला भाव

भडगाव, जि.जळगाव : तालुक्यातील वाक येथील आदर्श शेतकरी नरहर नगराज पाटील यांनी तीन एकर टिशुकल्चर केळीच्या क्षेत्रात ३५ ची सरासरी रास आकारत केळीची बाग चांगली फुलविली आहे. आतापर्यंत एक हजार रुपये जवळपास चांगला भाव मिळून आठ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. शेवटपर्यंत एकूण १४ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. अशा या आदर्श शेतकºयाने आदर्श शेती कष्टाने फुलविली आहे.
केळी लागवडीपूर्वी शेती नांगरटी नोव्हेंबर २०१६ मध्ये रोटाव्हेटर मारला. फेब्रुवारी महिन्यात ५६ ट्रीपा शेणखत तीन एकर जमिनीत पसरुन टाकले. नंतर दोन वेळा रोटा व्हेटर मारुन मातीत मिसळून घेतले. मार्च महिन्यात दुसरी नांगरटी केली. नंतर जून व जुलैमध्ये तन बघून कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या केल्या. आॅगस्ट महिन्यात सरी पाडून ३० बॅग सुफर फॉस्फेट व ३० बॅग निंबोळी पेंड टाकली. १ सप्टेबर २०१७ ला ५७५ या अंतरावर टिश्यू केळी ४४५० रोपांची लागवड केली व ठिबक सिंचनच्या ड्रीपने पाणी देण्याची केळीला सोय केली.
फेब्रुवारीला पहिल्या आठवड्यात दुसरी ठिबकची ड्रीप लाईन टाकली व झाडाला दोघा बाजुने पाणी देण्याचे नियोजन केले. १ फेब्रुवारीला केळीचे बागेतील पील कापतांना नवीन लहान बारीक अंकुर सोङुन आगोदरचे पील कापले. नंतर पील बाग दुरीचेही नियोजन केले. आतापर्यंत ८० टक्के पील ५ फुटांपर्यंत वाढलेले आहेत. केळी बागेवर कोणतेही लिक्वीड व तन नाशकाचा वापर केलेला नाही. चांगल्या नियोजनाने केळी बाग फुलविली आहे.
 

Web Title: Flora banana garden in Wahe village of Bhadgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.