कजगावात बहरतेय बांबूची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 08:42 PM2020-12-26T20:42:13+5:302020-12-26T20:43:34+5:30

कजगावचे प्रगतिशील शेतकरी मांगीलाल जैन आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करीत शेती आगळ्या वेगळ्या पध्दतीने फुलवत आहेत.

A flourishing bamboo farm in Kajgaon | कजगावात बहरतेय बांबूची शेती

कजगावात बहरतेय बांबूची शेती

Next
ठळक मुद्देदररोज सकाळी पाच तास उद्योगव्यवसायाबरोबर शेतीचीदेखील आवड 

प्रमोद ललवाणी

कजगाव, ता.भडगाव : उद्योग व्यवसायाबरोबर शेतीची विशेष आवड असलेले कजगावचे प्रगतिशील शेतकरी मांगीलाल जैन आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करीत शेती आगळ्या वेगळ्या पध्दतीने फुलवत आहेत. शेतात फुललेली त्यांची बांबूची शेती आकर्षण ठरत आहे.
कजगाव परिसरही केळी उत्पन्नासाठी भारतात प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या सात-आठ वर्षात कमी पावसामुळे केळी लागवड सातत्याने कमी होत गेली. पण गेल्या दोन वर्षापासून होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे जलपातळी वाढल्याने कजगाव पट्ट्यातील केळी लागवडीसह अन्य फळ बागायत वाढू लागली आहे. यात केळी, मोसंबी, लिंबू, पपई, ऊस यासह अनेक फळ बागायत लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
येथील प्रगतिशील शेतकरी तथा उद्योजक मांगीलाल जैन यांनी आपल्या शेतात आंबा, चिकू, लिंबू, सीताफळ, नारळासह अनेक फळांची लागवड केली. यात पुन्हा गेल्या वर्षी पाच एकर क्षेत्रात अडीच  हजार  बांबू रोपाची लागवड केली. वर्षभरात बांबू २० ते २५ फूट वाढल्याने या बांबूची शेती एक जंगलच बनले आहे. सर्वदूर फळबागा त्यात डोलदार उभे बांबू प्रत्येकाचे आकर्षण ठरत आहे, तर संपूर्ण शेती फळबाग करत या ठिकाणी साडेपाचशे लिंबू, साडेतीनशे चिकू, पाचशे आंबा, १२५ नारळ, १२५ सीताफळ व अन्य फळाची लागवड केली आहे. पूर्ण क्षेत्रच फळबाग केल्याने परिसर सौंदर्याने नटला आहे.

आपल्या उद्योग-व्यवसायातून सकाळचा पाच तास वेळ शेतीसाठी देत संपूर्ण शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची आवड ही सुरुवातीपासूनच आहे. या आवडीतूनच संपूर्ण शेतजमीन फळबागायत केली आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी पाच एकर क्षेत्रात अडीच हजार बांबूची लागवड केली आहे. आज हे बांबू डोलदार उभे आहेत. त्या पद्धतीनेच इतर फळबागदेखील डोलदार उभी आहेत. फळबागेपासून दरवर्षी चांगले उत्पन्न मिळते. शेतीची आवड जास्त असल्यामुळे तिला फुलवण्याचा छंदच लागला आहे. यात एक वेगळाच आनंद मिळतो. सोबतच चांगले आरोग्यदेखील राहते.
-मांगीलाल जैन, प्रगतिशील शेतकरी तथा उद्योजक, कजगाव, ता.भडगाव

Web Title: A flourishing bamboo farm in Kajgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.