बासरीवादनाने रसिक सुखावले
By admin | Published: January 7, 2017 12:40 AM2017-01-07T00:40:54+5:302017-01-07T00:40:54+5:30
बालगंधर्व संगीत महोत्सव : गुंदेचा बंधुंच्या धृपद गायनाने जिंकली रसिकांची मने
भूषण खैरनार ल्ल जळगाव
बालंगधर्व महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस. सुरुवातीला दीपक चांदोरकरांनी प्रेक्षकांच्या अनुपस्थिती मुळे कार्यक्रम 55 मिनिटे उशीरा सुरु होत आहे. याबद्दल खंत व्यक्त केली. त्यानंतर पंडीत उमाकांत गुंदेचा व रमाकांत गुंदेचा तसेच पखवाज (मृदुंग) वादक अखिलेश गुंदेचा यांचा परिचय करुन दिला. त्यानंतर दोघी बंधुंनी आपल्या धीरगंभीर आवाजात मारवा रागाच्या रिषभात प्रवेश केला व हळूहळू वातावरण मारव्याचा सुगंध दरवळू लागला. संथगतीने नोमतोमची आलापी सुरू झाली. जेव्हा पंडीतजींनी मंद सत्पकातील षड्ज व निषाद रिषभ-धैवत लावले तेव्हा मारव्याचा रंग आणखी गडद झाला. क्रमाक्रमाने वाढत जाणा:या लयीत नुम तुमचे आलाप हे वातावरण उजिर्त करणारे होते.
त्यानंतर पंडीतजींनी अनाहत नाद उपासत वायू मंद मंद न्यारो बादल ही चौतालातील बंदीश अतिशय दमदार आवाजात व धृपदमध्ये येणा:या वेगवेगळ्या लयीत सादर केले. त्याच बरोबर अखिलेश गुंदेचा यांनी लयकारी वाजवून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
यानंतर अडाणा रागातील शिवस्तुतीने या सत्राचे समापन केले. या निमित्ताने जळगावकर रसिकांना सुलफाक्ता. यानंतर अडाणा रागातील सुलफाक्ता तालातील द्रुतलयीतील शिवस्तुतीने पंडीतजींनी या सत्राचे समापन केले.
दुस:या सत्रात सुचिस्मीता व देबोप्रिया यांनी राग जोगने बासरी वादनाला सुरुवात केली. आलाप-जोड-झाला. दोघींच्या सहवादनाने जोग फुलला. त्यानंतर झपतालाला सुरुवात झाली. ओजस आडीया यांनी झपताल अतिशय डौलदार पद्धतीने सादर केला. त्यावर दोघी अलगदपणे एकापाठोपाठ आलापी, लयकारी व ताना अतिशय सफाईदारपणे सादर करत होत्या. दोघींमध्ये जुगलबंदी नाही तर सहवादनच होत होते.
त्यानंतर द्रुत तीनतालात दोघींनी आपल्या बासरी वादनाने कसब दाखवून एक सुखद आनंद उपस्थितांना दिला.
या सत्राचे समापन या दोघी फ्ल्युट सिस्टर्सनी बांगला कीर्तन सादर केले. या निमित्ताने जळगावकर रसिकांना रविंद्र संगीताची अविट गोडी चाघायला मिळाली व तृप्तीचा अनुभव आला. एकंदरीत महोत्सवाच्या दुस:या दिवसाची सुरुवात बुलंद धृपद गायकीने व त्यातल्या दमदार पखवाज साथीने झाली. त्याच नजाकतीने दुस:या सत्रात बासरी वादनाने सहवादन सादर केले.या कलाकारांना रसिकांनी भरपूर दाद दिली.