खान्देशी सुपुत्राच्या बासरी सुरांची विदेशातही भुरळ

By admin | Published: May 20, 2017 01:25 PM2017-05-20T13:25:56+5:302017-05-20T13:25:56+5:30

‘संगीत’ ही कला सर्व श्रेष्ठ मानली आहे.

The flute tunes of Khandhya Sukutra also fascinate abroad | खान्देशी सुपुत्राच्या बासरी सुरांची विदेशातही भुरळ

खान्देशी सुपुत्राच्या बासरी सुरांची विदेशातही भुरळ

Next

संजय सोनार  / ऑनलाइन लोकमत

चाळीसगाव, जळगाव, दि. 20 - भारतीय संस्कृतीमध्ये एकूण 64 कला मानल्या गेल्या आहेत. त्यात ‘संगीत’ ही कला सर्व श्रेष्ठ मानली आहे. कारण यात भाव व रस या दोन्हींचा अंतर्भाव आहे व जो व्यापक आहे. अशा क्षेत्रात जगविख्यात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे परमशिष्य व खान्देशचा सुपूत्र विवेक सोनार यांनी अल्पवधीत बासरीवादक म्हणून भारतात वेगळी ओळख निर्माण करीत सर्वत्र नावलौकिक मिळविला आहे. या बळावरच त्यांनी फ्रान्स, स्वीत्झलर्ंड, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर, बांग्लादेश, दुबई, श्रीलंका, इराण, ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्य़ा ठिकाणी, विदेशातही आपली कला सादर करून कर्तृत्वाचा शिक्का उमटवला आहे.
बासरी हे असे  माध्यम आहे की, जे आपण आपल्या श्वासातून फुलवतो आणि कदाचित त्यामुळेच तिचा आवाज इतका मधुर आहे. बासरीबद्दल असे बोलले जाते की, बासरी हे आपल्या आत्म्याला स्पर्श करणारे एकमात्र वाद्य आहे. हे मनाला भुरळ घालणारे वाद्य तितकेसे सोपे नसले तरी विवेक सोनार यांच्या घरातील वारकरी संप्रदायाचे संस्कार, प्रेमळ भक्तीभाव व बासरीची ओढ यातून उपजत स्वर संस्कार त्यांच्यात उमलू लागला. संगीत ही जशी कला आहे तसेच एक शास्त्रही आहे. संगीताचे व्याकरण हे त्या शास्त्राचे महत्त्वाचे अंग आहे. समर्थ गुरूंच ही संगीतकला विद्याथ्यार्ला शिकवू शकतो. धडपड, रियाज, प्रय} याच्या जोडीलाच जर गुरूचे मार्गदर्शन मिळाले तर स्वरांच्या या अथांग सागरात सूर मारताना विश्वास वाटतो. विवेक सोनार यांच्या बाबतीत हेच झाले. घरातील भंगारात काढलेली गंज चढलेली जुनी मेटलची बासरी हातात आली, स्वच्छ, साफसूफ करून घेतली तर वाजली.  श्याम भवन नावाच्या एका मित्राने विवेकची बासरी घेतली व छान गाणी वाजवली. विवेक यांना त्याचा आनंद झाला की माझी बासरी वाजते, पुन्हा प्रय} केला पण फक्त आवाजापलीकडे काहीच निघत नव्हतं. माझी बासरी वाजते हा आनंद तर होताच पण मला वाजवता येतं नाही याचा राग विवेक यांना येत होता. खूप प्रय}ानंतर ते ‘देहाची तिजोरी भक्तीलाच ठेवा, उघड दार देवा आता उघड दार देवा’ हे गाणं स्वत:च वाजवायला शिकले आणि त्यानंतर बासरीच्या दुनियेतील दरवाजा खरोखर उघडला  व विवेक सोनार यांचा हा प्रवास सुरू झाला.
वडील रामचंद्र सोनार यांचे गाणे विवेक वाजवण्याचा प्रय} करू लागला. यानंतर बासरीतील पहिले गुरु पंडित पुरुषोत्तम अंतापूरकर यांचेकडे या संबंधीचे शिक्षण घेतले. यापुढे स्वर, साधना, तंत्रकरी, लयकरी ह्या सखोल ज्ञानासाठी जगविख्यात बासरी वादक, पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचेकडे विवेक दाखल झाले आणि ते गुरुचे परमप्रिय शिष्य बनले. गेली 20 वर्षे गुरु-शिष्य परंपरेनुसार मार्गदर्शन चालू असतानाच विवेक सोनार यांनी संबंध देशात अग्रणी तरुण बासरीवादक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली.
फ्युजन, जुगलबंदी असे अनेक कार्यक्रम त्यांनी सादर केलेत. फ्लूट स्फिम्फनी सादर करणारे विवेक सोनार जगातील पहिली व्यक्ती आहे. तसेच बासरीला समर्पित ‘बासरी उत्सव’ सुरू करणारी पहिली व्यक्ती आणि गुरुजी पंडित हरिप्रसाद यांच्या नावाने एक लाख रुपयांचा पुरस्कार सुरू करणारी पहिली व्यक्ती म्हणजे विवेक सोनार. यानंतर विवेक यांनी संगीत प्रवासात  ‘गुरुकुल प्रतिष्ठान’ची स्थापना केली आणि त्याद्वारे संगीत शिष्यवृत्ती, संगीत शिबिर, संगीत बैठक, खान्देश संगीत समारोह, आदरांजली, स्वरांजली अर्पण यासारखे अनेक उपक्रम आपल्या जन्मभूमी खान्देशात संगीत प्रचारासाठी राबविले आहे. भविष्यात नवीन प्रकल्प चाळीसगाव येथे सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे व खान्देशात संगीताची चळवळ आणखी दृढ व्हावी म्हणून विविध कार्यक्रम घेतले जाणार आहे.
अनेक पुरस्कारांनी सन्मानीत
विवेक सोनार यांच्या संगीत कलेमुळे त्यांना अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानीत केले आहे. त्यात ‘रमणीय वेणू गानमनी’ हा किताब आणि पंडित उपाधी हस्ते पद्मश्री एन.रमणी पुरस्कार, पं.राम मराठे पुरस्कार, पी.सावळाराम पुरस्कार, सूरमणी हा किताण, राष्ट्रीय शिष्यवृत्ती, वृंदावन गुरूकुल शिष्यवृत्ती, युवा गौरव पुरस्कार, ठाणे गुनिजन पुरस्कार आदींचा समावेश आहे. विशेषत: ते आकाशवाणी मान्यताप्राप्त कलाकार आहेत. त्यांनी आपले जीवन संगीत साधनेस अर्पण केले आहेत. यात त्यांनी अनेक शिष्यही घडविलेत. त्यात खान्देशचे योगेश पाटील, राज सोनार, डॉ.नरेश निकुंभ, संजय सोनवणे, मनोज गुरव आदी कलाकार बासरीमध्ये अविरत कार्यरत आहेत. यामध्ये त्यांचे शिष्य जे आज अनेक ठिकाणी गुरुशिष्य परंपरा वाढवताना दिसतात त्यामध्ये प्रशांत बनिया (मुंबई), रवी जोशी (नाशिक), हिमांशू गिंडे (ठाणे), ईश्वरन (ठाणे), सुनील पाटील (पुणे) यांचा समावेश आहे.

Web Title: The flute tunes of Khandhya Sukutra also fascinate abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.