प्रभात चौकातील उड्डाणपुलाला महाराणा प्रतापसिंहांचे नाव देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:16 AM2021-05-10T04:16:26+5:302021-05-10T04:16:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : प्रभात चौकातील उड्डाणपुलाला महाराणा प्रतापसिंह यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्रभात चौकातील उड्डाणपुलाला महाराणा प्रतापसिंह यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी केली. महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८१ जयंतीनिमित्त रक्तदान व प्लाझ्मा नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन अखिल भारतीय क्षत्रिय महासभा व सर्व समाजबांधव यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले.
यावेळी प्रभात चौकातील महाराणा प्रतापसिंह यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, नगरसेविका शुचिता हाडा, दीपमाला काळे यांनी पूजन केले. रक्तदान शिबिरात कोरोना संसर्गाला अनुसरून ८ प्लाझ्मा डोनर यांनी नोंदणी केली असून ७२ दात्यांनी रक्तदान केले.
यशस्वीतेसाठी युवा प्रदेशाध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर राजपूत, युवा अध्यक्ष दीपक राजपूत, शहराध्यक्ष किरण राजपुत, शहर युवा अध्यक्ष रोशन राजपुत, सोनू राजपुत , राहुल टोके, राज राजपूत, दर्शन राजपूत, मयूर राजपूत यांनी मेहनत घेतली.