युध्द कलेच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष

By admin | Published: February 20, 2017 01:17 AM2017-02-20T01:17:11+5:302017-02-20T01:17:11+5:30

मराठी प्रतिष्ठानतर्फे आयोजन : तलवारीने हातावर व डोक्यावर फोडले नारळ

Focus on the art of warfare | युध्द कलेच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष

युध्द कलेच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष

Next

जळगाव : मराठी प्रतिष्ठानतर्फे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर शिवजयंतीनिमित्ताने युध्दकलेचे प्रात्यक्षिक तसेच पोवाडय़ाचे आयोजन करण्यात आल़े यादरम्यान तलवारीने डोक्यावर नारळाचे दोन तुकडे करणे, हातावर काकडीचे दोन तुकडे करणे, वेगाने दांडपट्टा, भाला चालविणे या सारख्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी नागरिकांचे लक्ष वेधले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात झाली़ महापौर नितीन लढ्ढा, जिल्हा सरकारी वकील अॅड़ केतन ढाके, दलूभाऊ जैन, शिवरत्न दादा नेवे, प्रा़अजित वाघ, डॉ़ राधेशाम चौधरी, सुरेश पाटील, नगरसेविका ज्योती चव्हाण, नगरसेविका सुचीता हाडा, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, गजानन मालपुरे, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रविण वाडीले, किशोर भोसले उपस्थित होत़े सूत्रसंचालन मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड़जमील देशपांडे यांनी केल़े पोवाडे सादर
कार्यक्रमात प्रसिध्द कै़शाहीर दिलीप सखाराम जोशी यांचे पूत्र संग्राम जोशी, संदीप जोशी यांनी  पोवाडे सादर केले. त्यांना हार्मोनियमवर पांडुरंग सोनवणे, ढोलकी प्रविण महाजन तसेच संदीप सपकाळे, दिवीज जोशी यांनी साथसंगत दिली़ खजानसिंग छाबडा यांचे कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभल़े यशस्वितेसाठी प्रतिष्ठानचे विजयकुमार वाणी, प्रमोद ब:हाटे, शरद पाटील, किरण कासार, जयश्री मालपुरे,  अमित यादव, संजीवनी तायडे, हर्षाली चौधरी यांनी परिश्रम घेतल़े
कोपरी, ठाणे येथील कालकाई माता मित्र मंडळाने दानपट्टा, ढाल-तलवार, लाठी-काठी,भाला यांची थरारक प्रात्यक्षिक सादर केली़ यात विठोबा पार्टे, बारकु भोसले, बबली मालुसरे, बंटी मालुसरे, अंकुश भोसले, विजय म्हात्रे, मंगेश दामंगे, अभिषेक पार्टे यांचा सहभाग होता़ तलवारीचे सहाय्याने डोक्यावर नारळ, तसेच हातावर काकडी कापतांना अंगावर काटे उभे राहिले होत़े प्रात्यक्षिकांसाठी वसाहतींमधील, रस्त्यावरून ये-जा करणा:या नागरिकांनी गर्दी केली होती़ नागरिकांनी प्रात्यक्षिकानंतर टाळ्यांव्दारे दाद देवून कलाकारांचा उत्साह वाढविला़

Web Title: Focus on the art of warfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.