नोकरीसह व्यवसाय निर्मितीवर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 01:05 PM2019-07-22T13:05:54+5:302019-07-22T13:08:08+5:30
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन
जळगाव : ज्या क्षेत्रात आवड असेल त्या क्षेत्रामध्ये आपण स्वत:ला यशस्वी करावे, मात्र नोकरी करित असताना व्यावसाय निर्मितीलाही भर द्यावा, कारण शिक्षणासह विद्यार्थ्यांना सर्व गुण अवगत पाहिजे असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
युवा विकास फाउंडेशन जळगाव, सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था आणि अखिल भारतीय लेवा विकास महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता़ त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री सुरेशदादा जैन, कुटुंबनायक रमेश विठू पाटील, महापौर सीमा भोळे, आयुक्त उदय टेकाळे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, गफ्फार मलिक, मनोज पाटील, डॉ.स्नेहल फेगडे, जितेंद्र देशमुख, डॉ. नरेंद्र जैन, गजानन मालपुरे, महेश पाटील, नगरसेवक अनंत जोशी, प्रशांत नाईक, शरद तायडे, श्याम कोगटा, विराज कावडिया आदी उपस्थित होते. यावेळी सुमारे ६७० गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़
यशस्वेतेसाठी ललित चौधरी, महेश पाटील, महेंद्र पाटील, ललित महाजन, हेमंत पाटील, राजेश वारके, प्रा.सुरेश अत्तरदे, बिपीन झोपे, विवेक महाजन, डॉ.निलेश पाटील,धनंजय तळेले, प्रा.अतुल इंगळे, चेतन पाटील,एकनाथ पाचपांडे, राहुल पाटील, खेमराज पाटील, विजय नारखेडे, नरेंद्र बोरसे, सचिन महाजन, प्रफुल्ल सरोदे, विक्की काळे, सचिन पाटील, दीपक भांबरे, निखिल नेहते, सागर झांबरे, विक्की भंगाळे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. डॉ.कल्पना भारंबे आणि प्रा. अतुल फेगडे यांनी तर आभार डॉ. स्नेहल फेगडे यांनी केले.
समाजाचा विकासही साधावा
चांगले गुण मिळवणे आनंदाची गोष्ट आहे. मात्र गुण मिळवण्यासाठी अभ्यासासह समाज विकास साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे असा सल्ला माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी विद्यार्थ्यांना दिला तर आहार व व्यायाम याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे मोबाईल व इंटरनेट यांचा वापर अभ्यासासाठी करण्याचे डॉ. स्नेहल फेगडे यांनी सांगितले. मनोज पाटील, गफ्फार मलिक यांनीही मनोगत व्यक्त केले.