विद्याथ्र्याच्या कौशल्य विकासावर उमविचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2017 12:18 AM2017-03-16T00:18:55+5:302017-03-16T00:18:55+5:30
40 नव्या योजनांची घोषणा : 282.10 कोटींचा अर्थसंकल्प सादर; 12.24 कोटींची तूट
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा सन 2017-18 या आर्थिक वर्षाचा 282.10 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी विद्यापीठाचे लेखा व वित्त अधिकारी डॉ.डी.बी.क:हाड यांनी सादर केला. यामध्ये परिक्षणासाठी 177.20 कोटी, योजनांतर्गत विकासासाठी 48.67 कोटी आणि विशेष कार्यक्रम योजनांसाठी 56.23 अशी एकूण खर्चासाठी 282.10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात उत्पन्नासाठीची 269.86 कोटी रुपये इतकी असल्यामुळे 12.24 कोटी इतक्या तुटीचा हा अर्थसंकल्प असेल. खर्चात बचत करून तूट शुन्यावर आणण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
यंदाच्या अर्थसंकल्पात विद्याथ्र्याच्या कौशल्य विकासावर अधिक भर देण्यात आला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी तरतूद करण्यात आली असली, तरी तूट कमी करण्यावर विद्यापीठाने अधिक भर दिला आहे. विद्याथ्र्यासाठी कौशल्य विकास केंद्र, विद्यापीठ-उद्योग संवाद कक्ष, लॅब टू लॅण्डचे सुसज्ज केंद्र, पेटंट सेल, ट्रायबल व लोककला अकादमी उभारणी, विद्यार्थी बससेवा, बांधकाम विकासकामे अशा 40 नावीण्यपूर्ण योजना व उपक्रम कार्यान्वित करण्याचा संकल्प यंदाच्या अर्थसंकल्पाव्दारे करण्यात आला आहे. उमविच्या अधिसभा सभागृहात बुधवारी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत लेखा व वित्त अधिकारी डॉ.डी.बी.क:हाड यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी प्रभारी कुलसचिव प्रा.डॉ.ए.बी.चौधरी, परीक्षा नियंत्रक डॉ.डी.एन.गुजराथी यांच्यासह व्यवस्थापन मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
अर्थसंकल्पाच्या ठळक बाबी
अर्थसंकल्पात विद्यापीठाच्या प्रशासकीय खर्चासाठी 34.23 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. परीक्षा विभागाच्या नियमित व प्रयोगशील योजनांसाठी 32.18 कोटींची तरतूद, शैक्षणिक विभागाच्या नियमित खर्चासाठी 13.13 कोटी, विद्यार्थी कल्याण विभागाच्या साहाय्य योजनांसाठी एकूण 8.13 कोटी, ज्यामध्ये कमवा व शिका 2.50 कोटी, दत्तक योजना 50 लाख, वैद्यकीय मदत 30 लाख व विकास निधीसाठी 50 लाख यांचा समावेश असेल. विद्यापीठ व संलगिAत महाविद्यालयात सर्व विद्याथ्र्याचा अपघात विमा गेल्यावर्षाप्रमाणे यंदा काढण्यात येणार आहे. योजनेत्तर खर्चासाठी एकूण 146.79 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सातवा वेतन आयोग, मागील वर्षाचे वेतन फरक, इतर देयता, नियमित वेतन शिक्षकेत्तर भत्ते, व रोजंदारीवर नियुक्त यांचा वेतनासाठी 3.30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
बांधकाम व विकास कामे यामध्ये प्रशासकीय, शैक्षणिक, निवासी इमारती व अन्य विकासकामांसाठी 34.70 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
‘रुसा’ अंतर्गत विद्यापीठास विविध प्रकल्पांसाठी 20 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 6 कोटी इतकी रक्कम मागील वर्षात मिळाली होती. उर्वरित रक्कम यावर्षी अपेक्षित आहे. कुलगुरू प्रोत्साहन योजनेंतर्गत 50 लाख व पेटंट प्रोत्साहन योजनेसाठी 25 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. धुळे उपकेंद्र दैनंदिन व इतर खर्चासाठी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी 70 लाखांची तसेच माजी सैनिकांच्या मुलींच्या वसतीगृह खरेदीसाठी 50 लाखांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
आविष्कार स्पर्धेप्रमाणे युवारंग महोत्सव
विद्यापीठाच्या कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजनेसाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात 2 कोटी 50 लाख रुपयांची भरघोस तरतूद केली आहे. गतवर्षीपेक्षा ही तरतूद दुप्पट आहे. विशेष म्हणजे या योजनेत भाग घेणा:या प्रत्येक विद्याथ्र्याला प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
विद्याथ्र्यासाठी शहर बस सेवा सुरू करण्यात आली असून या बसमधून जे विद्यार्थी मासिक पास घेऊन प्रवास करतील त्यांना या पासची 50 टक्के रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येईल त्यासाठी 75 लाखांची तरतूद करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून प्रशाळा, वसतिगृह येथे जाण्या-येण्यासाठी मोफत इलेक्ट्रीक रिक्षा सुरू करण्याचा विद्यापीठाचा विचार असून त्यासाठी 25 लाख तरतूद आहे. महाविद्यालयातील दत्तक योजनेसाठी महाविद्यालयांना अनुदान दिले जाणार असून त्यासाठी 5 लाख तरतूद करण्यात आली आहे.
यावर्षी युवारंग विद्यापीठात होणार असून, युवारंग आविष्कार स्पर्धेप्रमाणे प्रथम जिल्हा पातळीवर आयोजित करण्यात येऊन, यामध्ये निवड झालेल्या गुणवंत कलावंताना विद्यापीठ पातळीवर आपल कलागुण सादर करावे लागणार आहेत. युवारंग महोत्सवासाठी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठातील विभागीय उपहारगृहासाठी 10 लाख, स्पर्धात्मक परीक्षेच्या पूर्वतयारीच्या कार्यशाळेसाठी 10 लाख अशी तरतूद करण्यात आली आहे.