युवकांना जोडण्यासाठी ग्रामीण भागाकडे लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:30 AM2021-02-21T04:30:21+5:302021-02-21T04:30:21+5:30

जळगाव : भारत सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्राच्या जास्तीत जास्त युवा स्वयंसेवकांची फळी जिल्ह्यात उभारताना विकसनशील परिसर, झोपडपट्टी, ...

Focus on rural areas to connect youth | युवकांना जोडण्यासाठी ग्रामीण भागाकडे लक्ष द्या

युवकांना जोडण्यासाठी ग्रामीण भागाकडे लक्ष द्या

Next

जळगाव : भारत सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्राच्या जास्तीत जास्त युवा स्वयंसेवकांची फळी जिल्ह्यात उभारताना विकसनशील परिसर, झोपडपट्टी, ग्रामीण भागात युवक गट स्थापन करा व युवकांना जोडण्यासाठी ग्रामीण भागाकडे लक्ष द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या.

जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे एस.बी.पाटील, एनसीसीचे नारायण पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, एनएसएसचे संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, सामाजिक कार्य अधिकारी एस.एस. भोलाणे, संजय बेलोरकर, प्रमोद बारके, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सचिव विनोद बियाणी, युवक मंडळ सदस्य विनोद ढगे, स्वयंसेवक रणजित राजपूत आदी उपस्थित होते.

नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून अधिकाधिक उपक्रम आणि मोहीम राबवून युवक आणि मंडळांना नेहरू युवा केंद्राशी संलग्नित करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या. प्रास्ताविक नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांनी केले.

जलशक्ती अभियानच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन

जिल्हा युवा सल्लागार समितीच्या बैठकीत केंद्र शासनाने सुरू केलेल्या जलशक्ती अभियान - ‘कॅच द रेन’च्या भित्तीपत्रकाचे जिल्हाधिकारी राऊत यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात अधिकाधिक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

Web Title: Focus on rural areas to connect youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.