चाराअभावी दुग्ध व्यवसाय अडचणीत

By admin | Published: January 4, 2017 12:17 AM2017-01-04T00:17:14+5:302017-01-04T00:17:14+5:30

बळसाणे : कमी पावसामुळे यावर्षी बळसाणे व परिसराची खरीप हंगामाने निराशा केल्याने उन्हाळ्यात चारा समस्या जाणवणार आहे.

Fodder drought in the business of milk | चाराअभावी दुग्ध व्यवसाय अडचणीत

चाराअभावी दुग्ध व्यवसाय अडचणीत

Next

बळसाणे : कमी पावसामुळे यावर्षी बळसाणे व परिसराची खरीप हंगामाने निराशा केल्याने उन्हाळ्यात चारा समस्या जाणवणार आहे. या परिसरात  चाºयाचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. परजिल्ह्यातून कोरडा चारा आणून जनावरे जगवली जात आहे. या कारणाने दुग्ध व्यवसायावर परिणाम जाणवायला लागला आहे.
दुग्ध व्यवसाय टिकविण्यासाठी परजिल्ह्यातून चारा आणला जात आहे. चाºयाच्या अभावाने दुभती जनावरे व पशुधन कमी होण्याच्या मार्गावर आहे. दुसरीकडे विक्रीच्या चाºयामुळे दुधाळ म्हशींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पावसाळ्यात पाळीव प्राणी सहज पोसले जातात. परंतु उन्हाळ्यात त्यांना पोसणे अवघड होते. त्यामुळे नागरिकांना गायी, म्हशींचे दूध मिळणे कठीण झाले आहे. अल्प पावसामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. विकतचा चारा, महागडे पशुखाद्य, वैद्यकीय उपचारासह अन्य कारणांमुळे भाकड जनावरे,  औताचे बैल व दुभती जनावरे अशा परिस्थितीत सांभाळ करणे कठीण झाले आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दुभती जनावरे कशीबशी पोसली जात आहेत. सध्या गायी, म्हशींच्या दुधाला फॅट लावला जातो. म्हशीचे दूध घरगुती वापरासाठी विकले जाते व गायीचे दूध डेअरीवर जाते.
दुग्ध व्यवसायात जनावरांना लागणारा चारा हाच प्रमुख घटक असून त्याचीच परिसरात कमतरता निर्माण झाली आहे. परिसरात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. शेतकºयाला दुधाच्या उत्पादनाबरोबर गुरांपासून शेणखतही मिळते.
पावसाळ्यात चाºयाची चिंता नसली तरी उन्हाळ्याकरिता नातेवाइकांकडे चाºयाची शोधाशोध सुरू असल्याचे येथील शेतकरी सरदार पाटील यांनी सांगितले. खरीप पिकाचा कोरडा चारा पूर्ण उन्हाळ्यात कामात येतो.
परंतु अल्प पावसाने खरीप हंगामात पिकांपासून कमी चारा निर्माण झाला, असे जाणकार शेतकºयांचे म्हणणे आहे . बळसाणे व परिसरातील विहिरींची पाणी पातळीही कमी होत असल्याचे सांगितले जात असून चाºयाच्या समस्येमुळे दुभती गुरे विकावी लागत असल्याचेही सांगण्यात आले.
 जनावरांना हिरवा चारा मिळत नाही. चाºयाच्या शोधासाठी भटकंती करावी लागत आहे.  जनावरांचे मुख्य खाद्य म्हणजे ढेप आहे. पण दिवसेंदिवस ढेपचे दर सरासरी १२०० ते १३०० रु.पर्यंत गेल्याने दुग्ध व्यवसाय करणे परवडत नाही. गावात दुधाचा ४५ ते ५० रुपयापर्यंत भाव आहे. दिवसाला एक गोणी ढेप लागते. त्यामुळे खर्च होणाºया पैशांच्या तुलनेत हातात काहीच पडत नाही..
- नारायण धनुरे,
दूध विक्रेता

Web Title: Fodder drought in the business of milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.