पाचोरा तालुक्यातील वाडी येथे चारा साक्षरता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 04:13 PM2019-01-07T16:13:12+5:302019-01-07T16:14:51+5:30

शिंदाड येथून जवळच असलेल्या वाडी, ता.पाचोरा येथे नुकतेच चारा साक्षरता अभियान घेण्यात आले.

Fodder Literacy Campaign at Wadi in Pachora taluka | पाचोरा तालुक्यातील वाडी येथे चारा साक्षरता अभियान

पाचोरा तालुक्यातील वाडी येथे चारा साक्षरता अभियान

Next
ठळक मुद्देदुष्काळी परिस्थितीत चाऱ्याचे नियोजननिकृष्ट चाºयाचे सकस चाºयात रूपांतर करावेजनावरांच्या आहारात झाडांच्या पाल्याचा जास्तीत जास्त उपयोग करावाटाकाऊ चाºयापासून खत निर्मितीचे प्रात्याक्षिक


शिंदाड, ता.पाचोरा, जि.जळगाव : शिंदाड येथून जवळच असलेल्या वाडी, ता.पाचोरा येथे नुकतेच चारा साक्षरता अभियान घेण्यात आले.
पशुवैद्यकीय दवाखाना सातगाव श्रेणी २ अंतर्गत हा उपक्रम करण्यात आला. या अभियानाचे उद्घाटन पिंपळगाव-शिंदाड गटाचे जि.प. सदस्य मधुकर पाटील, पं.स.उपसभापती अनिता पवार, पशुवैद्यकीय विभागाचे सहायक उपायुक्त डॉ.एन.आर.पाटील, वाडी सरपंच व गोवर्धनधारी पशुपालक मंडळ अध्यक्षा मैनाबाई सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.ए.आर.महाजन, डॉ.अमित पाटील, डॉ.संदीप पाटील यांनी पशुपालक, शेतकरी यांना अभियानाचे महत्त्व सांगून दुष्काळी परिस्थितीत चाºयाचे नियोजन, अभियान उद्दिष्ट तसेच निकृष्ट चाºयाचे सकस चाºयात रूपांतर, जनावरांचे आरोग्य, जनावरांच्या आहारात झाडांच्या पाल्याचा जास्तीत जास्त उपयोग करावा याविषयी मार्गदर्शन केले. तसेच टाकाऊ चाºयापासून खत निर्मिती याविषयी प्रात्याक्षिक करून दाखवले.
जि.प.सदस्य मधुकर पाटील यांनी शेतकºयांना शासनाच्या योजनांची माहिती सांगून शासन शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासन दिले
या वेळी सुभाष पाटील, प्रकाश पाटील, डिगंबर पाटील, प्रकाश तळेकर, रामभाऊ पाटील, लक्ष्मण पाटील, किरण पांडे तसेच परिसरातील पशुपालक शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Fodder Literacy Campaign at Wadi in Pachora taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.