शेतकऱ्यांसमोर चाराटंचाईचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 05:19 PM2018-06-13T17:19:37+5:302018-06-13T17:19:37+5:30
जामनेर तालुका : सद्य:स्थितीत पशुधन सांभाळणे होतेय कठीण
पाळधी, ता.जामनेर (जि.जळगाव) : तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न भेडसावू लागला आहे. पाळधी येथील शेतकºयांना मिळेल तेथून चढ्या भावाने चाºयाची खरेदी करावी लागत आहे. सध्या शेतकºयांना पशुधन सांभाळणे कठीण बनले आहे.
तालुक्यात गेल्या वर्षी खरिपात पावसाने सुरूवात चांगली केली. शेतकºयांनी बाजरीबरोबर चाºयाच्या पिकांची पेरणी केली, पण पाऊस लांबल्याने हे पीक हातचे गेले. त्यामुळे खरिपाच्या हंगामातील चारा शेतकºयांच्या हाताशी आला नाही.
रब्बी हंगामात ज्वारी, मका पीक पावसाअभावी कमी प्रमाणावर आले. त्यामुळे चाºयाची समस्या निर्माण झाली आहे. पशुधनाला चारा उपलब्ध करण्यासाठी शेतकरी सध्या परिसरात चारा उपलब्ध नसल्याने यावल तालुक्यातील व्यापारी उसाचा हिरवागार चारा २७०० रुपये प्रति टनप्रमाणे विक्री करीत आहेत.
त्यामुळे पाळधीसह परिसरातील शेतकºयांंना पशुधन जगविणे कठीण झाले असून, त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या शेतामधील पेरणीच्या कामाला वेग आला आहे. यामुळे पशुधनाला चारा उपलब्ध करणे गरजेचे असल्याने शेतकºयांना मिळेल त्या भावाने चारा उपलब्ध करून साठवणूक करण्याची लगबग दिसून येत आहे.