चारा कडाडला : सर्जा-राजाच्या पोटासाठी बळीराजाची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 04:58 PM2019-02-28T16:58:51+5:302019-02-28T16:59:14+5:30

शेतकऱ्यांना पशूधन जगविण्याची चिंता

Fodder: The wolf roars for the stomach | चारा कडाडला : सर्जा-राजाच्या पोटासाठी बळीराजाची भटकंती

चारा कडाडला : सर्जा-राजाच्या पोटासाठी बळीराजाची भटकंती

Next

 आडगाव, ता. चाळीसगाव : दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढू लागला तसा चारा व पाण्यासह ढेपेचाही पारा चढू लागल्याने मन्याड परिसरातील पशूपालक, शेतकरी चांगलेच हवालदिल झाले असून आर्थिक संकटाबरोबर मानसिक संकटात सापडले आहेत. शासनाने त्वरीत चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे.
मन्याड परीसरातील शेतकरी कधी नव्हे एवढा यंदा संकटात सापडला आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे मन्याड धरणासह परिसरातील नदी, नाले कोरडेठाक आहेत. खरीप, रब्बी दोन्ही हंगाम यावर्षी हातचे गेल्याने चाऱ्याचा मोठे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे.
खरीपात आलेला थोडाफार चारा महागडी किंमत देऊन कसाबसा मिळविला. तो जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत जेमतेम कामी आला. परंतु आता पैसे मोजूनही चारा मिळत नसल्याने शेतकºयांपुढे मोठे संकटच उभे राहिले आहे.
ढेपेचे भावही वधारले
चाºयासोबतच ढेपेचे भावही दिवसेंदिवस वाढत असल्याने गुरांना खाऊतरी काय घालावे अशी चिंता पशूपालकांना भेजसावत आहे. महागडा चारा व ढेपच्या मानाने दुधाचे भाव अल्प असल्याने केवळ गुरांचा संभाळ करणे एवढाच पैसा शेतकºयांच्या हाती येत आहे. मेहनत व गुरांपासून उत्पन्न याचा कुठलाही ताळमेळ बसत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.
शासनाने दुधावर देण्यात येणारे पाच रूपये अनुदान बंद केल्याने गायीचे दूध २० रुपए प्रती लिटर व म्हशीचे दूध ३१ रुपये ८० पैसे दर मिळत होता. पाण्याच्या एका बाटलीच्या किंमतीत दूध विक्री होत होते. जिल्हा दूध संघाने बुधवारी झालेल्या बैठकीत शासनाची वाट न पाहता गायीच्या दुधाच्या दरात १ रूपयांनी तर म्हशीच्या दुधाच्या दरात १ रुपए २० पैशांनी वाढ करून शेतकºयांना थोडा दिलासा दिला असल्याची चर्चा दूध उत्पादकांमध्ये आहे. शासनानेही दुधाला अनुदान देऊन पशुपालक शेतकºयांना आधार द्यावा, अशी जोरदार मागणी मन्याड परिसरातील शेतकºयांकडून होत आहे.
मन्याड परिसरात चाराबाणी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी वाट्टेल त्या भावाने चाºयासाठी फिरत आहे. काही शेतकºयांनी रब्बीत पेरणी केलेला दादरचा चारा दीड एकराचा बावन्न हजाराला तर काहींनी पच्च्याहत्तर हजाराला घेऊन आरक्षित करून ठेवला आहे. तर काही शेतकरी दोन हजार आठशे ते तीन हजार टन प्रमाणे ऊसाचा चारा घेऊन तजबीज करीत आहेत. काही शेतकरी केळीचे खांब व खोड तीन हजार प्रती ट्राली प्रमाणे घेऊन गुरांना खाऊ घालत आहेत. मक्याची कुट्टी प्रती वाहन सात ते आठ हजाराला घेत आहेत.

Web Title: Fodder: The wolf roars for the stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव