न्यायालयाचे आदेश पाळावेत अन्यथा कारवाई करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 06:46 PM2019-07-18T18:46:28+5:302019-07-18T18:47:03+5:30
अमळनेर : नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील कामांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने काढलेल्या ई-निविदा प्रक्रियेस उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे. आदेशाचे ...
अमळनेर : नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील कामांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने काढलेल्या ई-निविदा प्रक्रियेस उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे. आदेशाचे पालन करण्यात यावे, अन्यथा कायदेशीर कारवाईस जबाबदार राहाल, असा इशारा नगरपालिकेतर्फे अॅड.किरण पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्राद्वारे दिला आहे.
शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वषार्साठी विकास कामांसाठी २ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यात पालिकेने ठराव करून विविध प्रभागांतील खुल्या जागा विकसित करण्यासाठी १९ कामांना जिल्हाधिकारी यांची प्रशासकीय मान्यता मिळाली. ई-निविदेद्वारे पात्र ठेकेदारास कामे द़ेण्यात आली. त्यातील बहुतांश कामे प्रगतीपथावर असताना स्थानिक आमदारांच्या हस्तक्षेपामुळे अनुज्ञेय नसलेल्या शहराच्या हद्दीबाहेरील मुख्य रस्त्यावरील कामांना मंजुरी देण्यात आली होती.पालिकेने सार्वजनिक हिताची लोकोपयोगी कामे घेतली होती. मात्र, ती रद्द करून हद्दीबाहेरील मुख्य रस्त्यावरील प्रवेशद्वाराच्या कामांची निविदा प्रसिद्ध केली होती. याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ई-निविदा प्रक्रियेस स्थगिती दिली आहे. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी. अन्यथा कायदेशीर कार्यवाहीस आपण जबाबदार राहाल, असा इशारा पाटील यांनी पत्राद्वारे दिला आहे.
--