कोरोना काळात नियम पाळणे देवपूजेएवढेच श्रेष्ठ - आमदार सुरेश भोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:22 AM2021-02-26T04:22:46+5:302021-02-26T04:22:46+5:30
जळगाव : कोरोना महामारीत शासकीय नियम स्वयंशिस्तीने पाळणे देवपूजेएवढेच श्रेष्ठ असून आपत्तीत प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्त पाळणे ही देशसेवा ...
जळगाव : कोरोना महामारीत शासकीय नियम स्वयंशिस्तीने पाळणे देवपूजेएवढेच श्रेष्ठ असून आपत्तीत प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्त पाळणे ही देशसेवा आणि समाजसेवाच आहे, असे प्रतिपादन विश्वकर्मा जयंतीच्या कार्यक्रमात आमदार सुरेश भोळे यांनी केले.
विश्वकर्मा जयंती समाज बोर्डिंगमध्ये गुरुवारी विश्वकर्मा पांचाळ साहाय्यक मंडळ, महाराष्ट्र विश्वकर्मा सेना, सुतार समाज जनजागृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने साध्या पद्धतीने साजरी झाली.
त्या वेळी सुरेश भोळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज मंडळाचे अध्यक्ष अरुण जाधव होते. या वेळी सचिव एम.टी. लुले, निवृत्त मुख्याध्यापक सुपडू सुतार, पुरुषोत्तम चव्हाण, मनोहर रुले, नीलेश सोनवणे, विजय लुल्हे, महाराष्ट्र विश्वकर्मा सेनाध्यक्ष प्रमोद रुले, सेना प्रदेश सदस्य भागवत रुले, सुतार समाज जनजागृती महिला जिल्हाध्यक्ष मनीषा मेथाळकर, मीना रावळकर, दामिनी सूर्यवंशी, ज्ञानेश्वर मेथाळकर, वैभव सूर्यवंशी, सिद्धू चव्हाण आदी उपस्थित होते. प्रास्ताविक एम.टी. लुले, सूत्रसंचालन भागवत रुले तर आभार मनीषा मेथाळकर यांनी मानले.