जामनेर कोविड सेंटरमधील मुलांना खाऊसोबत खेळणीही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 04:00 PM2020-06-01T16:00:42+5:302020-06-01T16:02:04+5:30
कोविड केअर सेंटरमध्ये दाखल रुग्णाच्या सुविधेसाठी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वागतार्ह पाऊल उचलले आहे.
जामनेर, जि.जळगाव : पळासखेडे बुद्रूक, ता.जामनेर येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल रुग्णाच्या सुविधेसाठी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. लहान मुलांसाठी बिस्कीट, खाऊ, खेळणी सोबतच आरओचे शुध्द पाणी पुरवत आहे. महिलांची विशेष व्यवस्था आहे.
जामनेर व गारखेडे बुद्रूक येथील सुमारे ३६ रुग्ण सेंटरमध्ये असून, त्यांना प्रशासनाकडून नाश्ता, दोन वेळचे जेवण, दूध आदी पुरविले जात आहे. येथे १०० खाटांची व्यवस्था आहे. काही पंखे बंद होते, त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात आली.
मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी भेट दिली असता त्यांना लहान मुले दाखल असल्याचे दिसून आल्याने त्यांनी त्यांच्यासाठी बिस्कीट, खाऊ व खेळणी दिली. तहसीलदार अरुण शेवाळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे नियमित भेट देऊन रुग्णाची माहिती घेतात.