अन्नदानाचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:19 AM2021-06-09T04:19:22+5:302021-06-09T04:19:22+5:30
दक्षता महत्त्वाची जळगाव : शासकीय कार्यालयांमध्ये आता शंभर टक्के उपस्थिती राहणार असून या ठिकाणी दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचे मत ...
दक्षता महत्त्वाची
जळगाव : शासकीय कार्यालयांमध्ये आता शंभर टक्के उपस्थिती राहणार असून या ठिकाणी दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचे मत समोर येत आहे. विशेषत: जिल्हा परिषदेत जिल्हाभरातून लोक येत असतात, शिवाय दोन्ही लाटांमध्ये जिल्हा परिषदेतच कोरोनाचा अधिक शिरकाव झाला होता. त्या दृष्टीने या ठिकाणी बेफिकीरी चालणार नाही. हळू. हळू गर्दी वाढली आहे.
म्यूकरचे २५ रुग्ण
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात म्यूकरमायकोसिसचे २५ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील २ रुग्ण हे अतिदक्षता विभागात दाखल असून ७ रुग्ण हे ७ क्रमांच्या कक्षात उपचार घेत आहेत. सीटू कक्षात १६ रुग्ण दाखल आहेत. मध्यंतरी म्यूकरमायकोसिसचे सलग रुग्ण समोर आले होते.
कोरोनाचे मृत्यू घटले
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही नियमीत होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. मध्यंतरी दहा पेक्षा अधिक मृत्यू एका दिवसात या ठिकाणी नेांदविण्यात येत होते. मात्र, आता हीच संख्या एक किंवा दोनवर आली आहे. अन्य ग्रामीण यंत्रणेतही ही संख्या घटली आहे. सोमवारी जिल्ह्यात एक मृत्यू झाला होता. तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोंदविण्यात आला होता.
सिग्नल यंत्रणा बंदच
जळगाव : शहरातील प्रमुख चौकांमधील सिग्नल यंत्रणा बंदच असून वाहतूक कोंडीचा प्रश्न आता डोकेवर काढणार आहे. अजिंठा चौफुली, बेंडाळे चौक, चित्रा चौक, टॉवर चौक, आकाशवाणी, अशा प्रमुख चौकांमधील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होण्याची गरज असून अनलॉकमध्ये हे चौक पुन्हा एकदा गजबजले आहेत.