पारंपारिक नृत्य, गमंत-जंमत कवितांसह फूड फेस्टिव्हलने बहरले ‘चैतन्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 10:16 PM2020-01-27T22:16:38+5:302020-01-27T22:17:13+5:30
‘चैतन्य’ स्रेहसंमेलनात विद्यार्थ्यांची धमाल ; रांगोळीतून दिले सामाजिक संदेश
जळगाव- काव्यवाचन, कथाकथन त्यानंतर गंमत-जंमत कविता आणि पारंपारिक न्यृत्यांसह सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्यांनी सोमवारी मू़जे़ महाविद्यालयातील ‘चैतन्य’ स्रेहसंमेलन बहरला़ स्रेहसंमेलनात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी कलाविष्कार दाखवून दाद मिळवून घेतली.
मुळजी जेठा महाविद्यलयाच्या चैतन्य स्रेहसंमेलनाचे सोमवारी सकाळी ९ वाजता मोठ्या थाटात उद्घाटन झाले़ यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. पंकज नन्नवरे यांच्याहस्ते विविध छंद व ललितकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
अंताक्षरींची रंगली मैफेल
या स्नेहसंमेलनात काव्यवाचन कथाकथन, भाषण, गंमत-जंमत कवितेतून, मुल्जीयन गायक, एकल, युगल, समूहनृत्य, प्रश्नमंजुषा, एकांकिका , अंताक्षरी, विविध वेशभूषा, मनोरंजनप्रधान खेळ, ललितकला आदी विविध स्पर्धा घेण्यात आल्या़ या सर्वांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविणाºया विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, फूड फेस्टिव्हलमध्ये सुध्दा खवयांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता़ यावेळी कार्यक्रमात प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, डॉ.स.ना.भारंबे, प्रा.डॉ.गौरी राणे, डॉ.ए.पी.सरोदे, डॉ.बी.एन.केसुर, डॉ.दि.एस.इंगळे, प्रा.सुरेखा पालवे, वाय.ए.सैंदाणे आदी उपस्थित होते.
बेटी बचाओचा दिला संदेश
स्रेहसंमेलनात रांगोळी स्पर्धेनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले़ यावेळी सामाजिक संदेश देणाºया रांगोळ्या विद्यार्थिनींनी काढल्या होत्या़ त्यातून बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देण्यात आला़ त्याचबरोबर फ्रूट डेकोरेशन,प् ाूजा थाळी सजावट, नाणी-तिकीट इत्यादींचे संकलन,अरेबिक मेहंदी, पारंपारिक मेहंदी, केशभूषा, पेंटिंग रेखाचित्र, निसर्गचित्र, पोट्रेट व्यक्ती चित्रण, सलाद डेकोरेशन या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. फूड फेस्टीव्हलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले़ तर रक्तदान शिबिरात ५० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले.