सातपुड्याच्या पायथ्याशी वृक्षतोडीचा सपाटा सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 03:13 PM2019-07-10T15:13:46+5:302019-07-10T15:14:08+5:30
वर्डी, ता.चोपडा : गावालगत सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी गटाड शेतशिवारात अवैध वृक्षतोड सुरू आहे. ग्रामस्थांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली असता ...
वर्डी, ता.चोपडा : गावालगत सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी गटाड शेतशिवारात अवैध वृक्षतोड सुरू आहे. ग्रामस्थांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली असता हा प्रकार कायदेशीर असल्याचे सांगण्यात आले.मात्र, याबाबत ग्रामस्थांना संशय आहे. अतिप्रमाणात झाडांची कत्तल होत असून संबंधित वृक्षतोडीची तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वर्डी गावपरिसरात सर्रासपणे झाडांची कत्तल केली जात आहे. या ठिकाणी २०० ते ३०० डेरेदार वृक्षांची तोड केल्याचे सांगिले जाते. मात्र प्रत्यक्षात ५०० ते ६०० वृक्षांची लाकडांचा संग्रह करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तोड सातपुडा पर्वतातून केली जात असल्याने गावात संशय निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी वनविभाग कार्यालयाशी संपर्क केला. मात्र त्यांना सदर वृक्षतोडीची परवानगी घेतली असल्याचे सांगण्यात आले. एकीकडे शासनाकडून मोठ्या ‘झाडे लावा झाडे जगवा’ ही योजना सर्वत्र राबविली जात आहे. त्यात वनविभागाने एवढ्या वृक्षतोडीची परवानगी दिली कशी, ग्रामपंचायतीनेहीे ठराव मंजूर कसा केला याबाबत चर्चा सुरु आहे.