नातेवाईकांना मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:18 AM2021-01-03T04:18:00+5:302021-01-03T04:18:00+5:30
शौर्यदिन साजरा जळगाव : येथील पोलीस कॉलनीत भिमा कोरेगाव शोर्यदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी १ जानेवारी १८१८ च्या ...
शौर्यदिन साजरा
जळगाव : येथील पोलीस कॉलनीत भिमा कोरेगाव शोर्यदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी १ जानेवारी १८१८ च्या युद्धाची माहीती देण्यात आली. रविंद्र जंजाळे, अनिल इंगळे, दीपक तायडे, सीताबाई तायडे, अमोल वाघमारे, भिमराव सपकाळे आदी उपस्थित होते. भोजराज गायकवाड यांनी आभार मानले.
चाचण्या चार लाखांकडे
जळगाव : जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या ३ लाख ९६ हजार २४३ झाली आहे. लवकरच चार लाखांचा टप्पा पूर्ण होणार असल्याचे चित्र आहे. सद्यास्थितीत ॲन्टीजनपेक्षा आरटीपीसीआर चाचण्या अधिक होत आहेत. तसे आरोग्य विभागाकडून आदेशच प्राप्त झाले आहेत.
खड्डा बुजला
जळगाव : अजिंठा चौफुलीवरील धोकादायक ठरणारा रस्त्याच्या मधोमध असलेला भला मोठा खड्डा अखेर बुजण्यात आला आहे. या खड्ड्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता होती. रस्त्याच्या अगदी मधोमध तो असल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता.
बाहेरील दहा रुग्ण
जळगाव : जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातील दहा कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. ही संख्या ४८३ झाली असून यातील ४७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. या सक्रीय रुग्णांची संख्या दहावर पोहोचली आहे. बुलडाणा, मलकापूर, नाशिक आदी ठिकाणचे हे रुग्ण आहेत.
तहकूब सभा कधी
जळगाव : जिल्हा परिषदेच्या स्थायी समीतीची ३१ डिसेंबरला होणारी स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आल्यानंतर आचारसंहितनंतरच ही सभा होणार असल्याची माहिती आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे सभा होत नसल्याचे चित्र आहे.
निधीची अडचण कायम
जळगाव : जिल्हा परिषदेत यंदाच्या वर्षभरात निधीअभावी अडचणीचा सामना करावा लागल्याचे चित्र आहे. त्यात आहे त्या निधीचे नियोजन होत नसल्याचा आरोप सदस्यांकडून वारंवार होत असताना जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक बैठकाही झाल्या मात्र, हा तिढा सुटलेला नाही.
भंगार पडूनच
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या कक्षातून बाहेर काढलेले भंगार प्रयोगशाळेच्या समोर पडूनच आहे. त्यामुळे या भंगाराचा लिलाव होणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोन महिन्यांपासून हे भंगार या ठिकाणी पडून आहे.
वाहतुकीची मोठी कोंडी
जळगाव : शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी तैनात होते. मात्र, विस्कळीत वाहतुकीमुळे, वर्दळीमुळे वाहनांना अनेक वेळ थांबावे लागले होते. या ठिकाणी सिग्नल यंत्रणा नसल्याने गोंधळ वाढला आहे.
सीरो सर्वेकडे लक्ष
जळगाव : जिल्ह्यात आयसीएमआरकडून तिसऱ्या वेळी सीरो सर्वे करण्यात आला असून याच्या अहवालाकडे सर्वांचे लक्षलागून आहे. गेल्या सर्वेक्षणात जळगाव सर्वाधिक लोकांमध्ये ॲन्टीबॉडीज आढळून आल्या होत्या. राज्यात ही संख्या सर्वाधिक होती. त्यामुळे यंदाचा अहवाल काय होतो. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.