हरताळे जंगलात वणवा पेटलेलाच

By admin | Published: April 4, 2017 05:42 PM2017-04-04T17:42:27+5:302017-04-04T17:42:27+5:30

जंगलातील वणवा तीन दिवसापासून सुरू आहे. तो आटोक्यात येत नसल्याने वनविभाग हतबल झाले आहे. वणव्यात वनसंपदेसह वन्य प्राणी जळून खाक झाले आहेत.

In the forest of the forest, | हरताळे जंगलात वणवा पेटलेलाच

हरताळे जंगलात वणवा पेटलेलाच

Next

 हरताळे,ता.मुक्ताईनगर,दि.4- जंगलातील वणवा तीन दिवसापासून सुरू आहे. तो आटोक्यात येत नसल्याने वनविभाग हतबल झाले आहे. वणव्यात वनसंपदेसह वन्य प्राणी जळून खाक झाले आहेत.

वढवे जंगल, सलई प:हाळा, बेलखोरा या भागासह हरताळे येथील पर्यटन स्थळा र्पयत आग पोहचली आहे. वणवा अद्यापही सुरुच आहे. तो विझविण्याचे प्रय} सुरू आहे.
 गेल्या दोन दिवसापूर्वी वढवे जंगलातील आग विझवण्यास प्रशासन यशस्वी ठरले असता पुन्हा दुस:या दिवशीही कंपार्टमेंट 532, 533 मधील भाग गेल्या दोन दिवसापासून पेटतच आहे. 
डोंगराळ भाग असल्याने त्या ठिकाणी अगAीशमन दलाचा वापर करणे कठीण आहे. डोंगरद:यांमध्ये मोठी कसरत होत आहे. सुरूवातीला जंगलाला आग लागत असताना पाहिजे तशी दखल घेतली न गेल्याचा आरोप ग्रामस्थांतर्फे करण्यात आला.जेव्हा प्रशासन आग विझवण्यासाठी आले तेव्हा त्यांना ग्रामस्थांनी मदत   केली नाही.वणवा पेटत असताना तत्काळ आग विझविणा:या मोठय़ा यंत्रणेची गरज अपेक्षीत होती. आजही वणव्याची धग चालू आहे. (वार्ताहर)

Web Title: In the forest of the forest,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.