कजगावच्या बाजारात २०० ची बनावट नोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 08:22 PM2019-08-29T20:22:18+5:302019-08-29T20:34:42+5:30
व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण
कजगाव, ता. भडगाव : येथील व्यापारी पेठेत २०० रुपयाची बनवाट नोट दाखल झाल्याने व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत वृत्त असे की, येथील एका दुकानदाराकडे व्यवहारात एक २०० ची बनावट नोट आल्याचे रात्री हिशोब जोडताना लक्षात आले. सदर बाबीकडे पोलीस प्रशासनाने गांभिर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
या अगोदर देखील येथून जवळच असलेल्या बोरनार ता.भडगाव येथील शेतकरी अरुण पंडीत पाटील या शेतकऱ्यांस आलेल्या पाचशेच्या नोटानमध्ये एक पाचशेची बनावट नोट निघाल्याने कजगावच्या बाजारपेठेत नोटा तर आल्या नाहीत ना? या बाबीचा पोलीस प्रशासनाने शोध घ्यावा अशी मागणी आहे. बोरनार ता.भडगाव येथील शेतकरी अरुण पंडीत पाटील यांना तीन चार महिन्या पूर्वी पाचशे रुपयांच्या नोटांमध्ये एक बनावट नोट निघाली मात्र सदर ची नोट कोणत्या नोटा मध्ये आली ते त्यांना कळले नाही. कारण काही रक्कम रोख आली तर कजगावच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतुन दुधाचे पेमेंट आले होते. यानंतर दि.२८ रोजी येथील एका दुकानात आलेल्या विक्रीत दोनशे रुपयांची एक बनावट नोट मिळुन आल्याने कजगाव परिसरात बनावट नोटा चलनात आणणारे टोळके सक्रिय तर नाही ना? अशी शंका व्यक्त होत आहे.