सॅनीटायझरचा सर्वांनाच विसर, मास्कचा वापरही नगण्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:13 AM2021-06-04T04:13:23+5:302021-06-04T04:13:23+5:30

एसटी बसेसला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद स्टार ७७५ जळगाव : महामंडळाने काही मोजक्या मार्गांवर एसटी बसेस सुरु केल्या असल्या तरी ...

Forget about sanitizers, use of masks is negligible | सॅनीटायझरचा सर्वांनाच विसर, मास्कचा वापरही नगण्यच

सॅनीटायझरचा सर्वांनाच विसर, मास्कचा वापरही नगण्यच

Next

एसटी बसेसला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद

स्टार ७७५

जळगाव : महामंडळाने काही मोजक्या मार्गांवर एसटी बसेस सुरु केल्या असल्या तरी त्याला प्रवाशांचा अगदी अल्प प्रतिसाद मिळत आहे. अजूनही पूर्णक्षमतेने धावू शकत नाहीत, त्याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. दुसरीकडे कमी प्रमाणात का असेना बसेस सुरू झाल्याने वाहक व चालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाकडून आवश्यक ती जबाबदारी घ्यायला पाहिजे ती अजूनही घेतली जात नाही. एकही बस सॅनिटायझर केली जात नाही किंवा प्रवासीही त्याचा वापर करत नाही. अगदी मोजकेच्या प्रवाशांनी मास्कचा वापर केल्याचे ''लोकमत'' ने गुरुवारी केलेल्या पाहणीत आढळून आले.

जिल्ह्यातील एकूण बसेस ८००

सध्या सुरू असलेल्या बसेस : १००

एकूण कर्मचारी ४ हजार ४९

वाहक : १ हजार १३

चालक : १ हजार ६२६

सध्या कामावर वाहक : २००

सध्या कामावर चालक : २००

सर्वाधिक वाहतूक पाचोरा, चाळीसगाव मार्गावर

सध्या महामंडळाची सर्वाधिक प्रवाशी वाहतूक पाचोरा, चाळीसगाव मार्गावर सुरू आहे. या भागातून जळगाव येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या शेतीचे दिवस असल्याने बी बियाणे खरेदी असेल किंवा जिल्हा पातळीवर सरकारी कार्यालये त्या कामांसाठी नोकरदार वर्ग यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या मार्गावर सर्वाधिक ८ ते १० फेऱ्या होत असल्याचे सांगण्यात आले.

ना मास्क, ना सॅनिटायझर

लोकमत प्रतिनिधीने गुरुवारी सायंकाळी जळगाव आगारात जाऊन पाहणी केली असता बाहेर जाणारी एकही बस सॅनिटायईज करण्यात येत नव्हती. बसमध्ये बसलेल्या ९० टक्के प्रवाशांनी मास्क लावलेला होता. जळगाव -चाळीसगाव ( क्र.एम.एच.४० एन.९८१७), जळगाव- रावेर ( क्र.एम.एच.४०, एम.५१८७) व एरंडोल आगाराची धरणगाव जाणारी (क्र.एम.एच.१४, बी.टी.२३०२) या बसमध्ये जाऊन पाहणी केली. त्यात धरणगाव जाणाऱ्या बसच्या महिला वाहकानेच मास्क लावलेला नव्हता. उर्वरित बसमधील प्रवाशांनी मास्क लावलेला होता काहींनी लावलेला नव्हता.

दीड महिन्यात २५ कोटींचा तोटा

शासनाने १५ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. यात फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सर्व सामान्य नागरिकांसाठी बससेवा बंदच होती. दिवसभरात बोटावर मोजक्याच फेऱ्या होत असल्यामुळे महामंडळाच्या जळगाव विभागाचे या दीड महिन्यात २५ कोटींच्या घरात उत्पन्न बुडाल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.

प्रवाशी घरातच बसून

दीड महिन्याच्या लॉकडाऊननंतर महामंडळातर्फे सर्व मार्गांवरच्या बसेस मंगळवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, काही मार्ग वगळता बहुतांश मार्गावरून प्रवाशांचा या सेवेला अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या भीतीने नागरिक अजूनही घरातच राहत असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या बसेसनाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आहे. यामुळे डिझेलचा खर्चही निघत नसल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले. काहीजण खाजगी गाड्यांचा वापर करीत आहेत.

कोरोनामुळे महिनाभरा पासून बंद असलेली बससेवा पुन्हा सुरू झाल्यावर खूप आनंद आहे. बससेवा सुरू झाल्यावरच उत्पन्न येईल आणि कर्मचाऱ्यांचे पगारही होतील. गेल्या वर्षी बससेवा बंद असल्याने, पगारही रखडले होते.

-संदीप सूर्यवंशी, वाहक

कोरोनाचा बससेवेवर सर्वाधिक परिणाम पगारावर होतो. गेल्या वर्षी आम्हाला यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. आता मात्र, महिनाभराच्या लॉकडाऊन नंतर पुन्हा बससेवा सुरू झाल्याने खूप आनंदी आहे.

-विजय वराडे, चालक

Web Title: Forget about sanitizers, use of masks is negligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.