भाजपाचे माजी आमदार प्रा. घोडे यांचे निलंबन रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:22 PM2019-03-30T12:22:28+5:302019-03-30T12:23:50+5:30
पक्षात सक्रीय होण्याचे केले आवाहन
चाळीसगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे यांच्यावर दीड वर्षापूर्वी केलेली निलंबनाची कारवाई मागे घेतली आहे.
दीड वर्षापूर्वी लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणुकीत प्रा. साहेबराव घोडे यांनी आपल्या स्नुषेसाठी भाजपाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र त्याचवेळी आमदार उन्मेष पाटील यांनी राष्ट्रवादीचे विश्वास चव्हाण यांचा थेट भाजपात प्रवेश घडवून त्यांच्या पत्नी आशालता चव्हाण यांच्या गळ््यात उमेदवारीची माळ टाकली. हा प्रकार जिव्हारी लागल्याने प्रा. घोडे यांनी लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीची उमेदवारी घेऊन आपल्या स्नुषा पुनम घोडे यांच्याव्दारे आशालता चव्हाण यांना आव्हान दिले होते. त्यात आशालता चव्हाण यांनी पुनम घोडे यांचा पराभव केला. याच दरम्यान भाजपाने आमदारकीची हॅट्रीक करणाऱ्या प्रा. घोडे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई केली होती. २७ रोजी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या आदेशान्वये प्रा. घोडे यांच्यावरील निलंबन पक्षाने मागे घेतले असून त्यांना पक्षात सक्रीय होण्याचे आवाहन केले.