जामनेरचे माजी आमदार आबाजी पाटील यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 12:59 PM2021-02-10T12:59:14+5:302021-02-10T12:59:40+5:30
Jalgaon News : जामनेर तालुक्याचे माजी आमदार आबाजी नाना पाटील ( ९४) यांचे वृध्दापकाळाने मंगळवारी रात्री शहापूर, ता.जामनेर या मूळगावी निधन झाले.
जळगांव - जामनेर तालुक्याचे माजी आमदार आबाजी नाना पाटील ( ९४) यांचे वृध्दापकाळाने मंगळवारी रात्री शहापूर, ता.जामनेर या मूळगावी निधन झाले.
ते १९६२ ते १९६७ व १९६७ ते १९७१ असे सलग १० वर्षे त्यांनी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. जिल्हा लोकल बोर्डाचे ते सदस्य होते. स्वातंत्र्य सैनिक (स्व) राजमल लखीचंद ललवाणी यांच्यासोबत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत काम केले. ललवाणी यांनी स्थापन केलेल्या जामनेर तालुका शिक्षण संस्थेचे ते सलग ४० वर्षे अध्यक्ष होते. त्यांच्या आमदारकीच्या पहिल्या कारकिर्दीत जामनेरला विज पुरवठ्यास सुरुवात झाली. सहकारी तत्वावरील पहिल्या रम प्रकल्पाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. पुणे विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून त्यांनी काम पाहीले. शिक्षण महर्षी असलेले पाटील हे अण्णासाहेब या नावाने ओळखले जात.