माजी मंत्री एकनाथ खडसे दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:10 AM2021-02-19T04:10:11+5:302021-02-19T04:10:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह खासदार रक्षा खडसेंना देखील लागण झाली आहे. एकनाथ खडसे व रक्षा खडसे यांनी आपापल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे जळगावच्या दौऱ्यावर होते. त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, त्यांनी हजेरी लावलेल्या कार्यक्रमात खडसे यांनी देखील हजेरी लावली होती.
दोन महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. दोन महिन्याच्या आत खडसे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. खडसे हे डिसेंबरमध्ये बाधित आल्याने ते ईडीच्या चौकशीला देखील सामोरे जाऊ शकले नव्हते. खडसे यांनी ट्विट करून दिली माहिती दिली असून, कोरोनाची चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला असून, माझी तब्येत चांगली आहे. काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती एकनाथ खडसे यांनी केली आहे. दरम्यान, रक्षा खडसे यांनीदेखील ट्विट करून कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले.