माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या पुस्तकाचे आज प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:15 AM2020-09-10T00:15:29+5:302020-09-10T00:18:15+5:30

२ सप्टेंबर रोजी रद्द झालेला माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावरील  जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा १० सप्टेंबर रोजी आॅनलाईन करण्यात येणार आहे.

Former Minister Eknathrao Khadse's book released today | माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या पुस्तकाचे आज प्रकाशन

माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या पुस्तकाचे आज प्रकाशन

Next
ठळक मुद्देकाय असेल पुस्तकात, साऱ्यांनाच उत्सुकता‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’मुक्ताईनगरात होणार आॅनलाईन प्रकाशननितीन गडकरी, रावसाहेब दानवेंसह मान्यवरांची हजेरी

मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : २ सप्टेंबर रोजी रद्द झालेला माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावरील  जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवार, १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुक्ताईनगरात खडसे फार्म हाऊस येथे आॅनलाईन करण्यात येणार आहे.
अलीकडे खडसेंनी फडणविसांवर केलेला हल्लाबोल पाहता या पुस्तकाच्या आॅनलाईन प्रकाशनात ठिकठिकाणावरून राज्यातील कोणकोणते नेते सहभागी होतात हे लक्षवेधी ठरणार आहे. या पुस्तकात काय आहे याची उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे खडसेंच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कोणते नेते सहभागी होतात याचीही उत्कंठा आहे तर संघर्षाच्या मूडमध्ये आलेले खडसे पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्ताने काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष लागून आहे
२ सप्टेंबर रोजी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस होता. यानिमित्ताने खडसे यांच्यावरील ‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ हे पुस्तक प्रकाशित होणार होते मात्र माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने राष्ट्रीय दुखवट्यामुळे २ रोजी रद्द करण्यात आला होता. आता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आता गुरुवार, १० रोजी होत आहे. बेधडक वक्ता असलेले खडसे पक्षाअंतर्गत आप्त स्वकयांच्या षङ्यंत्राचे बळी पडले आहेत. अशात खडसे यांच्यावरील पुस्तकात नेमके काय आहे याची उत्सुकता लागून आहे. त्यात ही पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ८ दिवस पुढे लोटला गेल्याने पुस्तकाबाबतची उत्कंठा शिगेला आहे.
एकनाथराव खडसे यांच्या बालपणापासून आतापर्यंतचा प्रवास मांडण्यात आलेल्या ‘जनसेवेचा मान बिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचे लेखन भुसावळचे प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी केले आहे. अथर्व पब्लिकेशनच्या माध्यमातून २१९ पानांचे हे पुस्तक प्रकाशित होत आहे. खडसे यांची मुखमंत्री पदाची हुकलेली संधी, त्यांच्यातले अष्टपैलू गुण, स्वच्छंदी कलाकार, आवडी-निवडी, समाजातील मान्यवर पक्षातील नेत्यांच्या, कुटुंबातील सदस्य कार्यकर्ते यांच्या प्रतिक्रियांचा अंतर्भाव यात करण्यात आला असून राजकारणात गॉड फादर या बाबत चे संबोधन यात आहे.
नाथाभाऊ यांच्या राजकारणातील प्रवासात अच्छे दिन पासून अलीकडच्या काल खंडातील चक्रव्यूहात अडकलेले नाथाभाऊ या घडामोडीबाबत या पुस्तकात नेमके काय या बाबत लेखकाने अद्याप कोणतेही भाष्य केले नसल्याने उद्या पुस्तकात नेमके काय आहे हे समोर येणार आहे.
दरम्यान, खडसेंवर आणखी एक पुस्तक लवकरच येणार आहे. ‘नानासाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान’ असे या पुस्तकाचे शीर्षक आहे. हे पुस्तक केव्हा प्रकाशित होईल याचीदेखील प्रतीक्षा लागून आहे.
तीन दिवस हल्लाबोल
२ सप्टेंबर रोजी या पुस्तकाच्या निमित्ताने खडसेंनी फडणविसांवर एकामागून एक तीन दिवस हल्ला चढविला होता. खडसे यांनी थेट आडवा येणाऱ्यांना आडवे पडणार असे सांगून संघर्षाची भूमिका स्पष्ट केली आहे, तर माझ्याविरुद्ध षङ्यंत्र करणाºयांचे पुरावे हाती लागले असून, या नवीन पुस्तकात पुराव्यानिशी त्याचा भांडाफोड करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यभरात याची चर्चा रंगली होती. आता खडसे उद्या काय बोलतात याची उत्सुकता आहे.
नितीन गडकरी, रावसाहेब दानवेंसह मान्यवरांची हजेरी
पुस्तकाचे लेखक डॉ. सुनील नेवे यांनी दिलेल्या माहितीनुसार १० रोजी सकाळी ११ वाजता खडसे यांच्या फार्महाऊसवर आॅनलाईन प्रकाशनाचा मुख्य सोहळा होणार आहे, तर याच वेळेस केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे आपापल्या ठिकाणावरून आॅनलाइन प्रकाशन करणार आहेत. तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडसे फार्म हाऊस येथे खासदार रक्षा खडसे, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, बेटी बचावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, जि.प.अध्यक्ष रंजना प्रल्हाद पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा बँक चेअरमन रोहिणी खडसे खेवलकर, भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष अशोक कांडेलकर, जि.प. सभापती जयपाल बोदडे यांच्यासह विधानसभा क्षेत्रातील नगराध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी एकनाथराव खडसे यांच्या जीवनपटावर ९ मिनिटांची डाक्युमेंट्री फिल्मही दाखविली जाणार आहे.

Web Title: Former Minister Eknathrao Khadse's book released today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.