जिरेनियम शेतीला माजी मंत्री सतीश पाटील यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:12 AM2021-06-05T04:12:38+5:302021-06-05T04:12:38+5:30

सायगांव येथील वसुंधरा सेंद्रिय बहुउद्देशीय शेतकरी गटाचे अध्यक्ष मंगेश महाले यांनी स्वत:च्या शेतातील एक एकर क्षेत्रांत सुगंधी जिरे अर्थात ...

Former Minister Satish Patil's visit to Geranium Agriculture | जिरेनियम शेतीला माजी मंत्री सतीश पाटील यांची भेट

जिरेनियम शेतीला माजी मंत्री सतीश पाटील यांची भेट

Next

सायगांव येथील वसुंधरा सेंद्रिय बहुउद्देशीय शेतकरी गटाचे अध्यक्ष मंगेश महाले यांनी स्वत:च्या शेतातील एक एकर क्षेत्रांत सुगंधी जिरे अर्थात जिरेनियम या पिकाची लागवड केली आहे . या लागवडीमुळे सायगांव व परिसरात एक चर्चेचा विषय ठरला आहे. सायगांव येथील तरूण मंगेश महाले यांनी हा प्रयोग केला आहे. हा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. मंगेश महाले यांनी उत्तरप्रदेश, बरेली येथे कुक्कुटपालन व शेती व्यवसाय याबाबत प्रशिक्षण घेतले आहे. आज माजी मंत्री सतीश पाटील, महानंदा डेअरीचे संचालक प्रमोद पाटील, जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, गणेश नर्सरी, हातले येथील विनोद परदेशी व माजी सभापती भडगांव राजू परदेशी व इतरांनी भेट दिली. जिरेनियम शेतीविषयी सतीश पाटील यांनी बारकाईने शेतीची अभ्यासपूर्ण माहिती घेतली. मंगेश महाले यांनी केलेली शेती पाहून समाधान व्यक्त केले. मंगेश महाले यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

Web Title: Former Minister Satish Patil's visit to Geranium Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.