दैवच बलवत्तर... 2 दिवसांपूर्वीच भाडेकरू घराबाहेर पडले अन् इमारत जमिनदोस्त झाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 10:17 IST2021-09-21T10:13:37+5:302021-09-21T10:17:56+5:30
शहरातील व्हीपी रोडवरील मुंबई निवासी असलेल्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा येथे इन्व्हेस्टमेंट म्हणून तीन मजली इमारत सुमारे पाच वर्षांपूर्वी बांधकाम केली होती.

दैवच बलवत्तर... 2 दिवसांपूर्वीच भाडेकरू घराबाहेर पडले अन् इमारत जमिनदोस्त झाली
श्यामकांत सराफ
पाचोरा (जि. जळगाव) - शहरात जोरदार पावसाने व्ही.पी. रोडवरील तीन मजली इमारत सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पत्यासारखी कोसळली. त्या ठिकाणी राहणाऱ्यांना दोन दिवसापूर्वीच बाहेर काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. येथील भाडेकरूंचे नशिबच बलवत्तर, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. गेल्या 5 वर्षांपूर्वी काही तांत्रिक दोष राहिल्याने शहरातील बाहेरपुरा भागात तीन मजली इमारत कोसळली होती. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
Video : जळगावात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत, व्हिडिओ झाला व्हायरल
शहरातील व्हीपी रोडवरील मुंबई निवासी असलेल्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा येथे इन्व्हेस्टमेंट म्हणून तीन मजली इमारत सुमारे पाच वर्षांपूर्वी बांधकाम केली होती. मात्र, या इमारतीला पावसाने तडा पडला म्हणून येथे असलेले भाडेकरू यांनी इमारत रिकामी केली होती. जोरदार पाऊस पडल्याने सोमवारी रात्री साडेदहाला ही इमारत अचानक कोसळली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. यापूर्वी नगर परिषदने हा रोड बंद केला होता. परिसरातील आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेतल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. इमारत कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.