चाळीसगावी अभाविपच्या विद्यार्थिनी संमेलनाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 02:59 PM2019-09-14T14:59:47+5:302019-09-14T14:59:54+5:30
रविवारी संमेलनाची सांगता
चाळीसगाव: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 'विस्तारणारी क्षितिजे' या राज्यस्तरीय विद्यार्थिनी संमेलनाला गणपती लॉन्स येथे शनिवारी सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. दिव्यांग महिला परिवाराच्या प्रमुख मिनाक्षी निकम यांच्या हस्ते उदघाटनाचे दीप उजळले.
यावेळी विचारपीठावर अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे, प्रदेश उपमंत्री प्रा. गीता सांगवीकर, प्रदेश सहमंत्री अंकिता कामठीकर, स्वागताध्यक्ष डॉ. सुनील राजपुत, अभाविपचे जिल्हा प्रमुख प्राचार्य डॉ. राहुल कुलकर्णी, शहरमंत्री शुभंम जोशी, संयक्षक डॉ. हेमांगी पुर्णपात्रे, ल.वि.पाठक, स्वागत समितीचे उपाध्यक्ष सुधीर पाटील, सहसचीव मिलिंद देव, मेघा बक्षी, उन्मेष बाळकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.
दोन दिवसीय संमेलनात भारताच्या जडणघडणीत महिलांचे योगदान, महिला आरोग्य व कायदा, स्त्रीशक्ति मुलाखत समांतर सत्र आदींचे आयोजन केले असून विशेषत: विद्यार्थिनी प्रबोधन जागर केला जाणार आहे. रविवारी संमेलनाची सांगता होईल.