चाळीसगावच्या ‘त्या’ म्हणतात, ‘रडायचं नाही, आता लढायचं...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 01:12 AM2020-03-08T01:12:30+5:302020-03-08T01:32:23+5:30
त्या सुई-दोºयाची अशी किमया साधलीय चाळीसगाव येथील ‘उद्योगिनी परिवारातील’ २३ महिलांच्या ४६ हातांनी. त्यांच्या डोळ्यात आता अश्रुंऐवजी परिस्थितीला हरविण्याचा एल्गार आहे.
जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि.जळगाव :
‘सुई - दोरा, टाका हसरा
संघषार्ची वाट हीच खरी
ध्येय ठेऊनी सरळ
धाव घ्यावी पैलतिरी...’
त्या सुई-दोºयाची अशी किमया साधलीय चाळीसगाव येथील ‘उद्योगिनी परिवारातील’ २३ महिलांच्या ४६ हातांनी. त्यांच्या डोळ्यात आता अश्रुंऐवजी परिस्थितीला हरविण्याचा एल्गार आहे. मिळून २३ महिलांनी आपल्या फाटक्या परिस्थितीला सांधलेय. आपल्या कुटुंंबासाठी त्या ‘सुखाचा धागा’ झाल्या आहेत. त्यांचा उंच झोका महिला दिनी म्हणूनच आदर्श ठरतो.
२०१७ मध्ये तीन वर्षांपूर्वी महिला उद्योगिनी उपक्रमाचे चाक फिरले. हाती होते फक्त सुई-दोरा आणि पायाखाली शिलाई मशिनचे पायडल. मात्र तीन वर्षात या महिलांच्या आयुष्यात जगण्याची नवी उमेद भरलीय. त्या आता कुटुंंबाच्या 'कर्त्या' झाल्या आहेत. प्रत्येकीलाच वैयक्तिक आयुष्यात मोठा संघर्ष करावा लागला आहे. तथापि, संकटांच्या छातीवर दमदारपणे पाय रोवून त्यांनी 'नई उडान' घेतली आहे. कुटुंंबातील मुलांचे शिक्षण असो की वयोवृद्धांचे आजार यांना 'ती'च्या कमाईचा आधार मिळालाय. २३ कुटुंंबे पुन्हा नव्याने उभी राहिली आहेत. आनंदून गेली आहे.
फिरत्या चाकावरती मिळे कापडाला आकार
चाळीसगाव शहरातील भडगाव रोडलगतच्या कैलास नगरातील गजानन कंस्ट्रक्शनमध्ये उद्योगिनी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. उद्योगिनीमध्ये दाखल होण्यासाठी 'गरजू' ही मुख्य अट आहे. महिलांना एक महिना मोफत प्रशिक्षण देऊन शिलाई मशिनवरील कामे दिली जातात. प्रशिक्षणाच्या काळातही तीन हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाते. यानंतर दिवसभरात शिवण कामानुसार मोबदला दिला जातो. सध्या उद्योगिनी प्रकल्पात काम करणाºया बहुतांशी महिला विधवा, परितक्त्या, कौटुंबिक समस्यांना झुंज देणाºया आहेत. उद्योगिनी प्रकल्पात महिलांना स्वावलंबी बनविले जाते. त्यांना शिवण कामाची कामे देऊन मोबदला दिला जातो. सकाळी १० ते सायंकाळी सहापर्र्यंत त्या कामे करतात.
मदत नको, कामे द्या!
आत्मविश्वासाने परिस्थितीला हरवत २३ महिलांनी आपल्या सैरभैर झालेल्या कुटुंंबाला सावरले आहे. काहींनी पतीच्या निधनानंतर थेट परिवाराची जबाबदारी खांद्यावर घेतलीय. काहींनी आपले दु:ख उगाळत बसण्याऐवजी सुखाचे पदर विणले आहेत. मुलांची थांबलेली शिक्षण वारी सरू करून काहींनी 'हम लढेंगे' हाच मत्र दिला आहे. काहींनी उपवर मुला - मुलींची लग्ने लावून आपले कर्तेपण सिद्ध केले. आम्हाला मदत नको तर हातांना कामे द्या, असं या महिला आवर्जुन सांगतात. उद्योगिनी झालेल्या महिलांच्या मुलांचा गुणगौरव सभारंभ, वाढदिवस, दरदिवशी प्रार्थना. त्यांच्या दिवसाचे वेळापत्रक असे पुढे सरकते. शिलाई मशिनचे चाक फिरत असते आणि उद्योगिनीनींचे आयुष्य पुढे सरकत असते.