चाळीस व्हेंटिलेटर हलविले कक्षात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:17 AM2021-05-07T04:17:23+5:302021-05-07T04:17:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पीएम केअर फंडाकडून आलेल्या ५० पैकी ४० व्हेंटिलेटर हे दिव्यांग बोर्डाच्या कक्षात ठेवण्यात आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पीएम केअर फंडाकडून आलेल्या ५० पैकी ४० व्हेंटिलेटर हे दिव्यांग बोर्डाच्या कक्षात ठेवण्यात आले होते. ते गुरूवारी जुन्या अतिदक्षता विभागासह विवध कक्षात हलविण्यात आले. हे व्हेंटिलेटर या कक्षात कार्यान्वित होणार आहेत.
गेल्या आठवडाभरात पीएम केअरकडून व्हेंटीलेटर प्राप्त झाले होेते. त्यापेैकी दहा आधी आणि ४० व्हेंटिलेटर हे नंतर मिळाले होते. सद्याची परिस्थिती बघता त्यांची तातडीने चाचणी घेऊन त्यांचे इंन्स्टॉलेशन करण्यात आले होते. त्यातील दहा व्हेंटीलेटर आवश्यक त्या ठिकाणी हलविण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित चाळीसचे गुरूवारी नियोजन करण्यात आले. औषध वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.भाऊराव नाखले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कक्षात आवश्यकतेनुसार ते हलविण्यात आले.
आज ऑक्सिजन मिळणार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी ऑक्सिजन टँकमध्ये १६ टन ऑक्सिजन लिक्विड भरण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी टँकर येणे अपेक्षित आहे. ऑक्सिजनची मागणीही काही प्रमाणात घटल्याने स्थानिक प्रशासनाला यातून काहीसा दिलासा मिळाला आहे. शिवाय जिल्हा प्रशासनाकडून रोज टँकरची व्यवस्था होतच असते, त्यामुळे आणिबाणीची स्थिती नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.