भुसावळ दरोड्यातील चार आरोपींना मध्य प्रदेशातून केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:39 PM2019-07-21T23:39:12+5:302019-07-21T23:41:16+5:30

भुसावळ शहरातील जळगाव-यावल रोडवरील दरोडाप्रकरणी संशयित चार आरोपींना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.

Four accused of Bhusawal Dodge arrested from Madhya Pradesh | भुसावळ दरोड्यातील चार आरोपींना मध्य प्रदेशातून केली अटक

भुसावळ दरोड्यातील चार आरोपींना मध्य प्रदेशातून केली अटक

Next
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाईन्यायालयीन कोठडी

भुसावळ, जि.जळगाव : शहरातील जळगाव-यावल रोडवरील दरोडाप्रकरणी संशयित चार आरोपींना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
अमर विलास कोल्हे (वय २२, रा. कोल्हे हिल्स, जळगाव) व मित्र रवी विजय चव्हाण हे दोघे २३ एप्रिल रोजी रात्री १ वाजता येथील जळगाव-यावल रोडवरील होंडा शोरुमजवळील चहाच्या टपरीजवळ थांबले असता तेथे पांढऱ्या रंगाच्या कारमधून पांढरे कपडे घातलेल्या तिघांनी अमर व रवी यांना अचानक मारहाण केली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तसेच पाच ग्रॅम सोन्याची अंगठी व १० ग्रॅम सोने चैन तसेच रोख चार हजार ३६० असा एकूण ५९ हजार ७६० रुपयांचा ऐवज लांबविला होता. याबात येथील शहर पोलिसात अज्ञात आरोपींविरुद्ध गु.र.नं. ९७/१९, भा.दं.वि.३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखली एलसीबीचे पो.नि. बापू रोहोम यांना, भुसावळ व परिसरातील आरोपी गुन्ह्यानंतर मध्य प्रदेशात पळून जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पो.नि. बापू रोहम यांनी पोउनि स्वप्नील नाईक, पोहेकॉं रवींद्र पाटील, अनिल देशमुख, दीपक पाटील, अशोक वाघ, विजय पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे आदींचे पथक मध्य प्रदेशासह यावल व भुसावळ परिसरात पथके रवाना केले.
या पथकाने शिरवेल (मध्य प्रदेश) येथून आरोपी प्रमोद काशीनाथ पाटील (अकलूद, ता.यावल), गोविंदा पंढरीनाथ सपकाळे (अंजाळे, ता.यावल), विशाल आधार सपकाळे (पिंप्री, ता. यावल) व दिनेश सोमा भिल (रा.अकलूद, ता.यावल) यांना विविध ठिकाणांवरुन एकाच वेळी ताब्यात घेतले. सर्व आरोपींना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपींना २१ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

Web Title: Four accused of Bhusawal Dodge arrested from Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.