मंगळवारपासून जळगाव शहरात चार वाढिव लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 11:36 PM2021-05-07T23:36:32+5:302021-05-07T23:36:51+5:30
लसीकरण आढावा : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना जळगाव : कोराना प्रतिबंधक लसीकरणासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने जळगाव शहरात चार शासकीय ...
लसीकरण आढावा : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
जळगाव : कोराना प्रतिबंधक लसीकरणासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने जळगाव शहरात चार शासकीय लसीकरण केंद्र मंगळवार, ११ मे पासून सुरू करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय कोविड टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांच्यासह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.
चार नवीन केंद्र
जळगाव शहरात ११ मे पासून गणपती नगरातील स्वाध्याय भवन, मेहरूण परिसरात मुलतानी हॉस्पिटल या ठिकाणी १८ ते ४५ वयोगटाती व्यक्तींसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच शनिपेठ येथील शाहीर अमर शेख दवाखाना, निमखेडी रस्त्यावरील कांताई नेत्रालय या ठिकाणी ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींना कोविड लसीकरणासाठी कोविन पोर्टल, आरोग्य सेतू ॲपवर नोंदणी करणे व त्यानंतर वेळेसंबंधी व केंद्र संबंधित नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे. केवळ नोंदणी करून व वेळेची नोंदणी न करता केंद्रावर प्रवेश मिळणार नाही, याविषयी देखील पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.
४५ पेक्षा अधिक वय असलेल्या वयोगटासाठी ९ मे व अ१० मे या दोन दिवसात कोविशिल्डचा दुसरा डोस प्राधान्याने देण्यात येणार आहे. मंगळवार, ११ मे पासून कोविशिल्डचा दुसरा डोस व पहिला डोस चे अनुक्रमे सत्ता ७०:३० असे प्रमाण राहणार आहे.
४५ पेक्षा अधिक वय असलेल्या वयोगटाचे लसीकरण होत असलेल्या केंद्रावर उभ्या असलेल्या नागरिकांना उपलब्ध लसीइतके कुपन देण्यात येतील. त्याबाबत नोंदवहीत नोंदणी घेण्यात येऊन कुपन वाटपाचे दूरचित्रीकरण करण्यात येणार आहे.
लसीकरणाचे या पद्धतीने नियोजन राहणार असून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.