जळगावात चार दुचाकी जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:58 AM2018-12-25T11:58:43+5:302018-12-25T12:00:17+5:30

शिवाजीनगर व कांचन नगरातील घटना

Four bets of burns in Jalgaon | जळगावात चार दुचाकी जाळल्या

जळगावात चार दुचाकी जाळल्या

Next
ठळक मुद्देतीन संशयित ‘सीसीटीव्ही’त कैदपोलीस गांभीर्याने घेत नसल्याचा रहिवाशांचा आरोप, गुन्हा दाखल

जळगाव : शिवाजी नगर व कांचन नगर परिसरात एकाचवेळी मध्यरात्री चार दुचाकी जाळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी पहाटे उघडकीस आला आहे. कांचननगरातील घटनेत गाडी जाळताना तीन तरुण सीसीटीव्ही कैद झाले आहे. शनिपेठ परिसरात एकाच ठिकाणी शंभर मीटरच्या परिसरात वाहने जाळण्याची ही चौथी घटना आहे. पोलिसांकडे तक्रार करुनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी शनी पेठ पोलिसांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शहरात वारंवार घटना
शहरात दुचाकी, रिक्षा जाळण्याचे प्रकार वाढले आहेत. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. भरवस्तीत हे प्रकार घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत असताना असे प्रकार घडत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
दोन वेळा रिक्षाही जाळल्या
कांचनगरात गुड्डू विजय हळदे याचीही रिक्षा १३ आॅक्टोबर रोजी जाळण्यात आली होती. हळने यांनी उदरनिर्वाचे साधन म्हणून नवीन रिक्षा घेतली होती. ते राजपूत राहत असलेल्या परिसरातच राहतात. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. मात्र घटनेला २ महिने उलटूनही संशयित मोकाट आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यात खंडू चित्ते यांची दुचाकी जाळण्याची घटना घडली होती. घटनेला महिना उलटत नाही तोच ही घटना घडली.
यापूर्वीही राजपूतच्या दुचाकीची छेडखानी
यापूर्वी देखील विक्की राजपूत या तरुणाच्या दुचाकीच्या सीटवर ब्लेड मारणे, पेट्रोल चोरुन नेणे असा प्रकार उघडकीस आला आहे. परिसरात वाहने जाळल्याच्या घटनेमुळे राजपूत यांनी घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यात रविवारी पहाटे १ वाजून १४ मिनिटांनी तीन तरुण येतांना दिसत असून २ ते ५ मिनिटात त्यांनी दुचाकी पेटवून पळ काढल्याचे दिसून आले. तिन्ही जण हाफ पॅन्टवर घटानास्थळी आले. हे तरुण दुचाकीवर पेट्रोल ओततांना तसेच आगकाडीने दुचाकी पेटवितांना दिसून येत आहे.
शेजारी रहात असलेले बँकेत नोकरीला असलेले वसंत वाणी यांच्या सीसीटीव्ही कॅमेºयात तीन तरुण कैद झाले आहेत.
शिवाजीनगरात मध्यरात्री १२.१५ वाजता जाळल्या दुचाकी
सलीम मजीद खान कुटुंबासह शिवाजीनगरात वासु-सपना कॉम्प्लेक्सजवळ वास्तव्यास आहेत. सलीम व जहाँगिर हे दोघे भाऊ मार्केटींग करतात. नेहमीप्रमाणे रविवारी दोघे सायंकाळी कामावरुन परतले. सलीम यांनी त्यांची दुचाकी (क्र एम.एच १९ डीसी८९८६) तसेच जहाँगिर यांनी त्याच्याजवळील दुचाकी (क्र एम.एच १९ सी के ६३८८) ही दुचाकी रस्त्यालगत अंगणात लावली होती. मध्यरात्री १२.१५ वाजता लोकांचा आरडाओरड करण्याचा आवाज आला असता, सलीम खान यांनी बाहेर येवून पाहिले त्यावेळी दोन्ही दुचाकी जळत होत्या. पाणी मारुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोवर दुचाकी पूर्ण जळून नुकसान झाले होेते. याप्रकरणी सलीम खान यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात ७१ हजार रुपयांच्या दुचाकी जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांचन नगरात बापलेकाची दुचाकी जाळली
कांचनगरात सदगुरु किराणाजवळ ईश्वर नारायण राजपूत यांची दुचाकी (क्र.एम.एच १९ डीएस ८२७५) दुचाकी तर मुलगा विक्की राजपूत याची(क्र एम.एच १९ या दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. सकाळी राजपूत यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्याच दुचाकी जाळणाºया कैद झाले आहे. याप्रकरणी ईश्वर राजपूत यांच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिसात ७० हजार रुपयाच्या दोन दुचाकी जाळणाºया अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Four bets of burns in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.