बसमध्ये चोरी करणारे चौघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 08:18 PM2020-02-02T20:18:52+5:302020-02-02T20:18:57+5:30
यावल : एक लाख ७५ हजारांचे दागिने हस्तगत
यावल : भुसावळ वरून रविवारी यावलकडे पहाटेच्या बसने येत असलेल्या बसमधील प्रवाश्यांच्या बॅगा कापून त्यातील महागड्या वस्तु व दागिन्यांची चोरी करणाऱ्या चार जणांना येथील पोलीस निरीक्षक अरूण धनवडे व सहकाऱ्यांनी जेरबंद केले आहे. या आरोपींकडून पोलिसांनी एक लाख ७५ हजार रुपयांचे ७० ग्रॅम वजनाचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, यावलकडे येत असलेल्या एस.टी.क्र. एमएच ४०-एन-९०३६ मधून मनाली नितीन मराठे (वय ३२) ही विवाहिता भुसावळ वरून अंजाळे येथे येत असतांना प्रवासा दरम्यान मराठे यांची बॅग धारदार शस्त्राने कापून त्यातील सोन्याचे ७० ग्रॅम दागिन्यांची चोरी केल्याचे निदर्शनास आले.
ही बाब लक्षात येताच या महिलेने तत्काळ वाहक एस.पी.महाजन यांच्या लक्षात आणून दिली. यानंतर महाजन यांनी तातडीने दुरध्वनीवरून यावल पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता पो. नि. अरूण धनवडे यांनी हे. कॉ. गोरख पाटील, मुजफ्फर खान व सहकाºयासह घटनास्थळ गाठले . महिलेकडून घटनेची माहिती घेतल्यानंतर धनवडे यांच्या पोलिसी नजरेने बरोबर संशयितांना घेरले असता बसमधून प्रवास करीत असलेले उत्तर प्रदेशातील दौजी बाहुरी सिंग (वय४५), रिजवान मुनाफ झोजे (वय ३६), खुर्शीद महंमद ईर्शाद (वय २६) व गुजराथमधील कदीम मुस्ताक झोजे (वय २६) यांची तपासणी केली असता त्यांचेकडे सदर विवाहीतेच्या सोन्याच्या दोन पोतीसह अन्य सोन्याचे दागीने आढळून आले.
सध्या तालुक्यातल अट्रावल येथील प्रसीध्द मुंजोबाची यात्रा सुरू आहे. यात्रेमधे लाखो भाविक येत असल्याने या गर्दीचा गैरफायदा अनेक महीलांचे दागीने या ठिकाणी लंपास झालेले आहेत. याबाबतही कदाचित या चोरट्यांकडून आणखी माहिती मिळते का? याचाही प्रयत्न पोलीस करीत आहे. दरम्यान यात्रेत बंदोबस्त वाढवून चोरीच्या घटनांवर आळा घालावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.