त्या अल्पवयीन मुलावर चौघांनी केले अनैसर्गिक कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 08:54 PM2021-03-09T20:54:20+5:302021-03-09T20:55:08+5:30

संशयितांना अटक : गुन्ह्यात दोन कलम वाढविले

The four committed unnatural acts on that minor boy | त्या अल्पवयीन मुलावर चौघांनी केले अनैसर्गिक कृत्य

त्या अल्पवयीन मुलावर चौघांनी केले अनैसर्गिक कृत्य

Next


जळगाव : बसस्थानकाचा पत्ता विचारणाऱ्या अल्पवयीन मुलाला दुचाकीवर बसवून लूट करणाऱ्या चारही जणांनी या मुलाला निर्जन ठिकाणी नेवून तेथे अश्लिल चाळे व अनैसर्गिक कृत्य केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आधीच्या दाखल गुन्ह्यात मंगळवारी पॉक्सो व अनैसर्गिक कृत्य केल्याचे कलम वाढविण्यात आले आहे. दरम्यान, सम्राट नागेंद्रमणी त्रिपाठी (वय २०, सुप्रीम कॉलनी), शिव पवन इंवर (वय २०), मनीष उर्फ सनी राजेंद्र कोळी (वय २०), ऋषीकेश माधवराव मोरे (पाटील) (वय २१) तिघे रा.सदगुरू नगर, अयोध्यानगर यांना अटक करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा मुलाने फक्त लुटीचा प्रकार सांगितला होता. घरी गेल्यावर कुटुंबियाला माहिती दिल्यावर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर मंगळवारी मुलाचा पुरवणी जबाब घेऊन आधीच्या गुन्ह्यात कलम वाढविण्यात आले.पिडीत मुलगा हा शहरात शिक्षणासाठी येतो. गेल्या चार महिन्यापासून ते या मुलावर अनैसर्गिक कृत्य करीत असल्याचे उघड झाले. चौघांनी याचा व्हिडीओ केला असून वारंवार व्हिडीओची दाखविण्याची धमकी देवून त्याच्याकडून ७० हजार रूपये रोख घेतल्याचे तपासात उघड झाले आहे.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनीच या प्रकरणात लक्ष घालून पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांना संशयितांच्या शोधासाठी पथक रवाना करण्याच्या सूचना दिल्या. तेजस मराठे, अक्रम शेख, भास्कर ठाकरे आणि बशीर तडवी यांनी तिघांना मंगळवारी मालेगावात मनमाड फाट्याजवळून अटक केली तर ऋषीकेश मोरे याला विजय निकुंभ, उमेश भांडारकर, प्रफुल्ल धांडे, रतन गिते, नासिर शेख, योगेश इंधाटे यांनी जळगावातून अटक केली. न्यायालयात चौघांना १० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: The four committed unnatural acts on that minor boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.