चारा,पाण्याअभावी चार गायी दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 07:03 PM2019-05-07T19:03:32+5:302019-05-07T19:04:18+5:30
भोरस येथील घटना : शेतकरी संकटात
आडगाव, ता.चाळीसगाव : येधून जवळच असलेल्या देवळी येथे वास्तव्यास असलेले पोपट नगा काठेवाडी यांच्या ४ गायी पाण्याअभावी मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतांना भोरस बु.येथील शेतकरी भैय्यासाहेब परभत पाटील यांच्या ६ रोजी दोन गायी व ७ रोजी दोन भाकड वासऱ्या चारा व पाण्याअभावी मरण पावल्या. गोठ्यात बांधलेली चारही जनावरे अचानक गेल्याने शेतकºयासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
परीसरात चारा व पाण्याने उग्र रुप धारण केले आहे. सोन्यापेक्षाही चाºयाला किंमत आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.चारा बरोबर पाण्याचेही संकट उभे राहिल्याने आता जनावरे जगवावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गुरे जगविण्यासाठी बरेच शेतकरी चारा व पाण्याच्या शोधासाठी वणवण भटकत आहे.अपूर्ण चारा व पाण्याअभावी गुरांवर साथीचे रोग येवून तीव्र उंन्हामुळे जनावरे मृत्युमुखी पडत आहेत.गुरांच्या किंमती पेक्षाजास्त चारा व पाण्यावर खर्च करावा लागत असल्याने व ऐवढे करूनही गोठा रिकामा झाल्याने मी पूर्ण हताश झालो आहे असे भैय्यासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना आपल्या अश्रूंना वाट करून दिली.