चार दिवस सूरत व मुंबई पॅसेंजर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 01:04 PM2018-09-05T13:04:42+5:302018-09-05T13:06:58+5:30

तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम

Four days Surat and Mumbai passenger cancellation | चार दिवस सूरत व मुंबई पॅसेंजर रद्द

चार दिवस सूरत व मुंबई पॅसेंजर रद्द

Next
ठळक मुद्देप्रवाशांचे हाल होणार६ ते ९ सप्टेंबर दरम्यान पॅसेंजर गाड्या रद्द

जळगाव/भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भादली रेल्वेस्थानकावर तिसरी रेल्वे लाईन जोडणीचे कार्य सुरू होणार असल्याने ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान पॅसेंजर गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या मार्गात बदल झाला आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या अशा... गाडी क्रमांक ५९०१३ सुरत-भुसावल पॅसेंजर ही गाडी ५ ते ८ दरम्यान, तर परतीच्या ५९०१४ प्रवासात ६ ते ९ दरम्यान रद्द करण्यात आलेली आहे. गाडी क्रमांक ५९०८९ भुसावळ - सुरत पॅसेंजर ही गाडी ६ ते ९ व परतीच्या प्रवासात ५ ते ८ सप्टेंबर दरम्यान रद्द करण्यात आलेली आहे. गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ-सुरत पॅसेंजर ६ ते १० व गाडी क्रमांक ५९०७५ सूरत- भुसावल पॅसेंजर ५ ते ९. गाडी क्रमांक ५११८२ भुसावळ- देवळाली पॅसेंजर ५ ते ९ व परतीच्या प्रवासात ६ ते १० गाडी क्रमांक ५११५४ भुसावळ- मुंबई पॅसेंजर ६ ते ९ परतीच्या प्रवासात ६ ते १० दरम्यान रद्द करण्यात आलेली आहे.

Web Title: Four days Surat and Mumbai passenger cancellation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.