तलावात चौघे बुडाले, तिघे वाचले मात्र एकाने जीव गमावला; रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी

By विजय.सैतवाल | Published: December 29, 2023 07:35 PM2023-12-29T19:35:26+5:302023-12-29T19:35:33+5:30

मेहरुण तलावात बुडून एकुलता एक मुलगा गेला

Four drowned in the lake, three survived but one lost his life; Crowd of relatives at the hospital | तलावात चौघे बुडाले, तिघे वाचले मात्र एकाने जीव गमावला; रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी

तलावात चौघे बुडाले, तिघे वाचले मात्र एकाने जीव गमावला; रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी

जळगाव : मेहरुण तलावामध्ये आंघोळीसाठी गेलेल्या शाहू नगर परिसरातील १३ वर्षीय चार मुले पाण्यात बुडून गडांगळ्या खाऊ लागले, त्या वेळी तीन जणांना वाचविण्यात यश आले, मात्र ईशान शेख वसीम (१३, रा. शाहू नगर) या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरात घडली. घटनेनंतर तलाव परिसर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी झाली होती. 

शाहू नगर परिसरात राहणारे ईशान शेख, मोईन खान अमीन खान (१३), अयान तस्लीम भिस्ती (१३) व असलम शेख सलाउद्दीन (१३) सर्व रा. शाहूनगर, जळगाव हे चौघे जण शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरात आंघोळीसाठी गेले. चौघेही पाण्यात उतरले व काही वेळातच ते गटांगळ्या खाऊ लागले. हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आला. त्या वेळी ते मदतीसाठी धावले. यातील मोईन खान, अयान  भिस्ती व असलम शेख हे तिघे जण लवकर हाती लागले. त्यांना बाहेर काढून त्यांच्या पोटातून पाणी काढण्यात आले. त्यानंतर ईशान सापडला. चौघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ईशान याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.  

घटनेची माहिती मिळाल्यानंतर चारही मुलांचे नातेवाईक व परिसरातील नागरिक मेहरुण तलाव परिसर व रुग्णलयात पोहचले होते. त्यामुळे दोन्ही ठिकाणी गर्दी झाली होती. तसेच ईशानच्या मृत्यूची वार्ता कानी पडताच नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्यासह त्यांचे सहकारी घटनास्थळी व रुग्णालयात पोहचले. 

एकुलता एक मुलगा

मयत ईशानचे वडील पेंटर असून आई गृहिणी आहे. शेख दाम्पत्याला दोन मुली असून ईशान हा एकुलता एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा व बहिणींचा लाडका भाऊ गेल्याने शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Four drowned in the lake, three survived but one lost his life; Crowd of relatives at the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.